मजरेवाडी गावचे सुपुत्र कै. सिद्राम रामचंद्र लंगोटे यांचे दुःखद निधन.
प्रतिनिधी -सोलापूर, दि. २४ एप्रिल २०२६ सोलापूर उत्तर तालुक्यातील मजरेवाडी गावचे मूळ रहिवासी तथा जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क, रेणुका नगरजवळील लंगोटे वस्ती येथे वास्तव्यास असलेले सिद्राम रामचंद्र लंगोटे यांचे शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गत आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.