लिपिक वर्गीय संघटना (615) राज्य कार्यकारिणीची संवाद बैठक सोलापूर येथे संपन्न; जिल्हाध्यक्षपदी अविनाश गोडसे यांची निवड

प्रतिनिधी -सोलापूर, दि. 12 एप्रिल 2026
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची संवाद बैठक सोलापूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद लिपिकांच्या पदोन्नती टप्प्यांमध्ये कपात करून वर्ग-१ पर्यंतचे वेतन मिळवून देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर व राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी उपस्थित होते. राज्याध्यक्ष बाबर यांनी लिपिकांच्या वेतनत्रुटीचा मुद्दा उपस्थित करत पदोन्नती टप्पे कमी करण्याची गरज स्पष्ट केली. लिपिकांनी आपल्या पदांची तुलना तांत्रिक संवर्गाशी न करता राज्य शासनातील लिपिकांशी करावी, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्हा परिषद लिपिकांसाठी चार टप्प्यांऐवजी दोन टप्पे करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.मा. आमदार सत्यजितभाऊ देशमुख यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देताना, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे एकत्र करण्याचा प्रस्ताव पुढे सरकत असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे लिपिकांना वेतनश्रेणीचा लाभ होऊन वेतनत्रुटी दूर होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी दिवंगत लिपिक नेते कै. विवेक लिंगराज, कै. सयाजी बागल, कै. विशाल उंबरे यांच्यासह ज्ञात-अज्ञात लिपिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्यभरातील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर जिल्हा कार्यकारिणीकडून बैठकीचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश काळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.