कृषीदिनानिमित्त जिल्हा परिषदेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन; १ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न.
प्रतिनिधी -सोलापूर कृषी विभाग, महाराष्ट्र शासन (आत्मा, सोलापूर) व कृषी विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे संपन्न होणार आहे.जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार असून, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार-सावंत , मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, कृषी क्षेत्रातील अधिकारी व शेतकरी बांधव मोठ...