व्हीबीजी रामजी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा : जि.प. अध्यक्ष दिपक वैद्य
प्रतिनिधी - सोलापूर भारत सरकारच्या 'विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)' (VBRAG) अधिनियम-२०२५ ची राज्यात १ जुलैपासून अंमलबजावणी सुरू झाली असून, सोलापूर जिल्ह्यात या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी "व्हीबीजी रामजी" योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण विकासाला गती द्यावी, असे आवाहन अध्यक्ष वैद्य यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अंजली मरोड, गटविकास अधिकारी अरुण वाघमोडे, नायब तहसीलदार चंदे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, प्रदीप खांडेकर, करूणा शिवशरण, चंद्रकांत जाधव, शिवाजी जाधव, सुषमा नारनवर, चैताली मुळे, उपसभापती सुनील भोसले, कृषी अधिकारी मुरलीधर राजे, लेखाधिकारी बाबासाहेब माने यांच्यासह पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नरेगा विभागाचे अधिकारी व विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना अध्यक्ष दिपक वैद्य म...