सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी सप्तर्षी हावळे हिचे 10वी CBSE परीक्षेत 90% गुणांसह यश.

प्रतिनिधी -सोलापूर
CBSE बोर्ड परीक्षा 2026 मध्ये सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी कु. सप्तर्षी साजन हावळे हिने 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय 90% गुण मिळवत शाळा व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.
तिच्या या यशस्वी कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सप्तर्षीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे आई-वडील, शिक्षक तसेच संस्थेकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यात ती आणखी मोठी यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
-------------------------------------
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.