सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्साहात

प्रतिनिधी – सोलापूर 
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात भव्य आणि दिव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शहरातील विविध भागांतून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाची सुरुवात सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते तसेच डॉ. सूर्यप्रकाश कोठे मंडळाचे प्रमुख विनोद दादा वाघमारे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर त्रिशरण पंचशील बुद्ध पूजेचे आयोजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला.मिरवणुकीदरम्यान तथागत गौतम बुद्ध यांचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंडळातील कार्यकर्ते, सभासद तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे उत्सव अध्यक्ष कृष्णा कांबळे, उपाध्यक्ष गणेश लोंढे व सनी खळसुडे, कार्याध्यक्ष नरेश सोनवणे, सचिव स्वप्निल सुरवशे, खजिनदार विशाल गायकवाड तसेच मिरवणूक प्रमुख उदय वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी विश्वजीत कसबे, उत्तरेश्वर वाघमारे, नितीन वाघमारे, किशोर लोंढे, समाधान गाडे, ओम भडंगे, जॉन शिखरे, गौतम दंडाडे, गौतम वाघमारे, आकाश कांबळे, विकास गायकवाड, अक्षय नडगम, योगेश सोनवणे, हाजी, जानराव, शांतीसागर वाघमारे, अक्षय वाघमारे, सौरभ सुरवसे, शीतल खळसोडे, आकेश माने, बापू विकास खळसोडे थोरात, प्रदीप जगताप, चेतन कांबळे, गुलाब शेख, जयराज, संदेश थोरात, अक्षय शिरसागर, ओहोळ, प्रसाद रणदिवे आणि राहुल गेजगे आदींचा सहभाग होता.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.