ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.


प्रतिनिधी -सोलापूर 
शिवराज्यपत्र या वृत्तपत्राचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला. आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारी सर्वसामान्यांच्या व्यथा मांडत वंचित घटकांचा आवाज बुलंद करणारे पत्रकार म्हणून इकबाल शेख यांची ओळख आहे.
तरुणाईलाही लाजवेल अशी धडाडीची आणि प्रामाणिक पत्रकारिता त्यांनी ‘शिवराजपत्र’ या पोर्टलच्या माध्यमातून जपली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने लेखन करत त्यांनी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुके देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, ‘माया संदेश’चे संपादक चंदू भाऊ जाधव, वडार समाज उत्तर तालुका अध्यक्ष दशरथ नाना पवार, पत्रकार शब्बीर मणियार, रवी पवार, रमजान मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी इकबाल शेख यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.