डॉ. आंबेडकर क्रिकेट ट्रॉफी अंडर-१२ स्पर्धेला प्रारंभ; साऊथ सोलापूर आपटे ग्रुपची विजयी सलामी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साऊथ सोलापूर आपटे ग्रुप आयोजित डॉ. आंबेडकर क्रिकेट ट्रॉफी (अंडर-१२) स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर उत्साहात पार पडले. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे निवड समिती सदस्य विक्रांत पवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रणजी खेळाडू प्रवीण देशेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रशांत बाबर, दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड तसेच सुखद जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत एकूण ८ संघांनी सहभाग नोंदविला असून साखळी पद्धतीने प्रत्येक संघ ४ सामने खेळणार आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण ३२ सामने खेळविण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना साऊथ सोलापूर आपटे ग्रुप आणि युनायटेड क्रिकेट क्लब यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना साऊथ सोलापूर आपटे ग्रुपने ४५ षटकांत ६ बाद २६३ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. नील (६७) आणि तन्मय वाघमोडे (५७) यांच्या अर्धशतकांमुळे संघाला मजबूत धावसंख्या उभारता आली.
२६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युनायटेड क्रिकेट क्लबचा डाव कोसळला. साऊथ सोलापूरच्या समर्थ देशेट्टीने अचूक आणि भेदक गोलंदाजी करत २६ धावांत ५ बळी घेत युनायटेडचा कणा मोडला. युनायटेड संघ २६ षटकांत सर्वबाद १२७ धावांवर गारद झाला. परिणामी साऊथ सोलापूर आपटे ग्रुपने १३६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.या सामन्यात अतुल चौधरी आणि साकिब शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240