सोलापूर : शिवाजी नाईट कॉलेजमध्ये पीएच.डी. कोर्स वर्कचे यशस्वी आयोजन
सोलापूर, दि. १ एप्रिल — येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सोलापूरच्या इतिहास विभाग व पीएच.डी. संशोधन केंद्राच्या वतीने PET-9 विद्यार्थ्यांसाठी ९ मार्च ते २६ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाइन पीएच.डी. कोर्स वर्कचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सोलापूर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यात श्री शिवाजी महाविद्यालय (बार्शी), वसुंधरा कला महाविद्यालय (सोलापूर), सहकार महर्षी शंकरराव मोहिते महाविद्यालय (पंढरपूर) आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर) यांचा सक्रिय सहभाग होता.
या कोर्स वर्कदरम्यान ‘पेपर क्रमांक-२ : इन्फॉर्मेशन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (ICT) आणि रिसर्च पब्लिकेशन एथिक्स (RPE)’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत मान्यवर मार्गदर्शकांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक संशोधनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या उपक्रमाचे समन्वयक डॉ. युवराज सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मोटे, विभागप्रमुख डॉ. अरुण सोनकांबळे तसेच डॉ. विष्णू वाघमारे व डॉ. किशोर जोगदंड यांचे सहकार्य लाभले.
कार्यशाळेचा समारोप २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महाविद्यालयात पार पडला. या कार्यशाळेत एकूण ३८ पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.








Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240