ऑर्किड स्कूलची आरुषी उस्तुरगे सोलापुरात अव्वल; गुणवंतांचा उत्साहात सत्कार.

प्रतिनिधी -सोलापूर 

सीबीएसई दहावी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती मा. सौ. रंजिता चाकोते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, विश्वस्त सोमनाथ करजगी, योगिनाथ करजगी, मोहिनी करजगी, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे तसेच मार्गदर्शिका मीना पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेची विद्यार्थिनी आरुषी उस्तुरगे हिने ९९.६० टक्के गुण मिळवून सोलापुरात प्रथम क्रमांक पटकावला. तर यशराज भोसले याने ९९ टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवले. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शहरभर शाळेचे कौतुक होत आहे. आरुषीने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाला दिले.
यंदा एकूण १२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून शाळेची यशाची परंपरा कायम राखली आहे. मराठी विषयात २५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले. तसेच माहिती तंत्रज्ञान, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांतही अनेक विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुणांची नोंद केली.विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्राचार्या रुपाली हजारे व शिक्षकवृंद-तुलसाश्री चितारी, हीना पटेल, स्वाती कोकाटे, श्रीकांत जोशी, राजेश्वरी शिरकणहळळी, इमरान सय्यद, लता भोसले, अमित वाले, भाग्यश्री नंदी, ममता बालिंगल, आदिनाथ सरवदे, राजश्री महाले, आनंद लिगाडे, चंदन माने, कविता श्रीगादी, सारिका मुळे—यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात मा. रंजिता चाकोते यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना आपल्या आवडीनुसार योग्य क्षेत्र निवडण्याचा सल्ला दिला. पालक प्रतिनिधी राजेश छाजेड व रेवणसिद्ध उस्तुरगे यांनी शाळेच्या योगदानाचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुलसाश्री चितारी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.