स्वामी दर्शन घेतल्याने मनाला नवचैतन्य प्राप्त झाले - न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे

न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, न्यायाधीश एन.ए.एल.शेख व अन्य दिसत आहेत.
प्रतिनिधी -अक्कलकोट 
          येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेता आल्याने मनाला नवचैतन्य प्राप्त झाले असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती आबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येऊन श्री स्वामी समर्थांचे सपत्निक दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी न्यायमुर्ती आबासाहेब शिंदे यांचा सपत्नीक श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी न्यायमुर्ती आबासाहेब शिंदे बोलत होते. पुढे बोलताना न्यायमुर्ती शिंदे यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची दर्शन व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आहे.श्री स्वामी समर्थांचे दर्शन व मंदीर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले मनोगत.
या मुळे सर्व स्वामी भक्त कमीत कमी वेळात दर्शन घेऊन माघारी जाऊ शकतात याचे मोठे समाधान आहे. आज येथे मंदीर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आदर तिथ्थ्याबद्दल आपण मंदी समितीचे विशेष आभारी आहोत असे सांगून देवस्थानच्या सेवा कार्यास आपल्या शुभेच्या असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, 
अक्कलकोटचे न्यायाधीश एन.ए.एल. शेख, सागर महिंद्रकर, स्वप्निल मोरे, अविनाश सुरवसे, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.