श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची गर्दी; विविध सेवा उपक्रमांचे आयोजन-चेअरमन महेश क. इंगळे
प्रतिनिधी-अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ यांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट नगरीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातून येणाऱ्या स्वामी भक्तांचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान च्या वतीने भक्तांसाठी विविध सुविधा व उपक्रम राबविण्यात येत आहेत. देवस्थानचे चेअरमन महेश क. इंगळे यांनी स्वामी भक्तांना अक्कलकोट येथे दर्शनासाठी येण्याचे आवाहन करत सर्वांचे हार्दिक स्वागत केले आहे.देवस्थानतर्फे श्री वटवृक्ष मंदिरात वातानुकूलित गाभारा व मंडप, मंदिर परिसराचे सुशोभीकरण, तसेच भक्तांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये रुग्णसेवेसाठी रुग्णालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय व विद्यार्थी वस्तीगृह, तसेच बालकांसाठी शिशू विकास मंदिर यांचा समावेश आहे.
याशिवाय श्री राम मंदिर, श्री मुरलीधर मंदिर व श्री विठ्ठल मंदिर येथे भक्तांसाठी निवास व दर्शनरांगेची सोय करण्यात आली आहे. वर्षभर सण-उत्सवांच्या काळात प्रसाद वाटप, तसेच वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व सेवेकऱ्यांना दैनंदिन भोजन प्रसादाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते.तसेच मंदिर परिसरात होणाऱ्या उत्सव, यात्रा, सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठी धान्य स्वरूपात मदत केली जाते. परगावाहून येणाऱ्या दिंडी, पालखी सोहळ्यातील भाविक, तसेच पारायण सप्ताह, हरिनाम सप्ताह, दत्तयाग, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देवस्थानच्या वतीने केली जाते.
दरम्यान, पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी स्वामी चरणी प्रणाम अर्पण करत, अक्कलकोटमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आले आहे.देवस्थानच्या विश्वस्त मंडळात आत्माराम घाटगे यांच्यासह इतर सदस्यांचा सहभाग असून, ट्रस्टमार्फत विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
देणगीदारांना आयकर कायद्यानुसार ८० जी अंतर्गत सवलत उपलब्ध असल्याची माहितीही देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

---------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक-सिद्धार्थ भडकुंबे
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240