उन्हाळ्याच्या झळांपासून विद्यार्थ्यांना दिलासा; अंत्रोळी शाळेत टोपी व चप्पल वाटप.
प्रतिनिधी – अंत्रोळी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी येथे रॉबिन हूड आर्मी या सामाजिक संस्थेच्या वतीने वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना टोपी व चप्पलांचे वाटप करण्यात आले.सदर साहित्याचे वितरण संस्थेच्या सदस्य काजळे मॅडम व हिंदुराव गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्रीरंग दिनकर बनसोडे यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी रॉबिन हूड आर्मीच्या कार्याची माहिती देताना, “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, त्या भावनेतून हे कार्य अत्यंत समाजहिताचे असून इतर संस्थांनीही यापासून प्रेरणा घ्यावी,” असे मत व्यक्त केले.या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने संस्थेच्या कार्याला सलाम करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास मुख्याध्यापक युवराज राठोड, कीर्ती जाधव मॅडम, मीनाक्षी राठोड मॅडम, पुष्पा बनसोडे मॅडम, नागनाथ म्हमाने सर तसेच इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग बनसोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कीर्ती जाधव मॅडम यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240