“एक वाढदिवस… हजारो हास्य!” अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात माणुसकीचा महाउत्सव; ५ हजार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’

 
प्रतिनिधी -सोलापूर 
प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यात समाजसेवेचा भव्य महाउपक्रम राबविण्यात येणार आहे. शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने तब्बल १४ ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रमांचा संगम घडणार असून, “एक वाढदिवस… हजारो हास्य... माणुसकीचा महोत्सव” अशी संकल्पना प्रत्यक्षात साकार होणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ सोलापूरातील जुनी मिल कंपाऊंड मैदान येथे ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करून होणार आहे. याचवेळी इतर उपक्रमांचाही प्रारंभ होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे तन्वीर शेख व राज सलगर यांनी दिली.
दिवसभरात शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी उपक्रम राबविले जाणार असून, समाजाच्या सर्व घटकांना स्पर्श करणारी ही व्यापक मोहीम ठरणार आहे. विद्यार्थिनींसाठी २०० सायकली, १ हजार विद्यार्थ्यांना शालेय बॅग, तसेच ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी १० शाळांमध्ये आरओ फिल्टर प्लांट, डिजिटल स्मार्ट बोर्ड आणि संगणक संच देण्यात येणार आहेत.
स्वावलंबनासाठी २०० महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात येणार असून, अनाथ आश्रमासाठी ५० बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच जनावरांसाठी १०० ठिकाणी पाण्याची पात्रे बसवून नियमित पाणीपुरवठा करण्याचीही योजना आहे.
वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी आणि मंदिरांसाठी १ हजार पत्र्यांचे वाटप केले जाणार आहे. कुंभारी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर येथे बोअरवेल व सबमर्सिबल पंप बसवून पाण्याची सुविधा निर्माण केली जाणार आहे, तर गेनसिद्ध देवालय येथे ५८.५ केव्हीए क्षमतेचा जनरेटर बसविण्यात येणार आहे.
आरोग्य क्षेत्रातही मोठा दिलासा देत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी १०० मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एकाच दिवशी इतक्या व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यात माणुसकीचा खरा उत्सव अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर व धीरज कारंडे यांनी केले आहे.
🔹 उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
सोलापूर शहर व जिल्ह्यात १४ ठिकाणी एकाच दिवशी उपक्रम
५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप
शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबनावर विशेष भर
३०० विद्यार्थी दत्तक, १ हजार बॅग, २०० मुलींना सायकली
१०० मोफत शस्त्रक्रिया
२०० महिलांना शिलाई मशीन
“वाढदिवस साजरा करण्याची ही वेगळी परंपरा… जिथे आनंद फक्त स्वतःपुरता न राहता हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचतो!”



Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.