Posts

Showing posts from March, 2026

महानगरपालिका कॅम्प परिसरातील आठ शाळांना न्यायाधीश पथकाची भेट; विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आवाहन

Image
(प्रतिनिधी) : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त न्यायाधीश पथकाने महानगरपालिका कॅम्प परिसरातील शाळांची पाहणी करत शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधा, सुरक्षितता आणि स्वच्छतेचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यात परिसरातील एकूण आठ शाळांची तपासणी करण्यात आली असून मुख्याध्यापक व शिक्षकांना गुणवत्तावाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी वर्गांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्याकडून वाचन करून घेतले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने वाचन सादर केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, शिस्तबद्ध शालेय व्यवस्थापन आणि शिक्षणाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे त्यांनी विशेष आवाहन केले. भेटीदरम्यान शाळांमधील भौतिक सुविधा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, पोषण आहार, वर्गखोल्या तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांची सविस्तर पाहणी करण्यात आली. मुख्याध्यापकांनी भेडसावणाऱ्या अडचणी व समस्या पथकासमोर मांडल्या. या समस्यांची नोंद घेऊन त्यावर आवश्यक पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन पथकाने दिले. प्राथमिक ...

सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात अव्वल- मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा गौरव.

Image
सोलापूर, दि.३०(प्रतिनिधी)  महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना "उत्कृष्ट कार्यालय प्रमुख" म्हणून प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषदेने सेवाकर्मी कार्यक्रमातील विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत १०० पैकी ८० गुण मिळवले आणि राज्यात अव्वल स्थान मिळवले. ज्येष्ठता सूची अद्ययावत करणे, पदोन्नती व सरळसेवा नियुक्त्या, बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, iGOT पोर्टलवरील प्रशिक्षण तसेच सेवापुस्तक अद्ययावत ठेवणे या सर्व बाबींमध्ये जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कार्य केले. सेवाकर्मी कार्यक्रमात आदर्श कामगिरी ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यांकन करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेने र...

आदर्श समाजसेवक पुरस्काराने अप्पासाहेब लंगोटे यांचा सन्मान.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  ब्रिलियंट न्यूज चॅनेलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात अप्पासाहेब लंगोटे यांना "आदर्श समाजसेवक पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल, सोलापूर येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) सोलापूरचे डिन डॉ. ऋत्विक जयकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयकर, प्रा. भोजराज पवार, डॉ. विठ्ठल धडके, सौ. मया सिद्धे, सौ. मीना गायकवाड आणि ब्रिलियंट ग्रुपच्या अध्यक्षा कु. प्रणाली रासे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र उर्फ अप्पासाहेब लंगोटे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल "आदर्श समाजसेवक पुरस्कार" प्रदान करण्यात आला. डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, गुलाबाचे रोप आणि पुष्प देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात ...

आमदार सुभाष देशमुखांच्या प्रयत्नातून इंगळगी शाळेचा डिजिटल विकास;इंगळगी शाळेसाठी ८ लाखांचा निधी मंजूर; विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक सुविधा.

Image
दक्षिण सोलापूर (दि. २५)   इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या प्रयत्नातून तब्बल ८ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन तो शाळेला प्राप्त झाला आहे. हा निधी पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये एलईडी टीव्ही, स्मार्ट बोर्ड, प्रत्येक वर्गासाठी संगणक, शिक्षकांसाठी टेबल-खुर्च्या तसेच मुख्याध्यापकांसाठी सुसज्ज कार्यालयीन साहित्याचा समावेश आहे. याशिवाय शाळेसाठी विशेष एलईडी स्क्रीन बोर्डचीही व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित साहित्याची खरेदी पूर्ण झाली असून येत्या आठवड्यात शाळेत त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक दर्जात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या उपक्रमाबद्दल सरपंच विनोद बनसोडे, उद्योजक शिवानंद हत्तुरे, पत्रकार राहुल वंजारे, भाजप सोशल मीडि...

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रम उत्साहात भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप.

Image
प्रतिनिधी -सोलापूर, दि. २० मार्च २०२६  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री सरस्वती मंदिर प्रशाला, दत्त घाट, गणपती चौक, सोलापूर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी कीर्तन, भजन आणि प्रबोधनाची परंपरा समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. शासन आध्यात्मिक परंपरा जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या हस्ते सोलापूर परिसरातील पात्र भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप करण्यात आले. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी आणि भावार्थदीपिका यांसारख्या ग्रंथांद्वारे अध्यात्म आणि तत्त्वज्ञान सामान्यांच्या बोलीभाषेत मांडून समाजमनात प्रबोधनाची ज्योत पेटवली. समता, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा ...

पत्रकार राम हुंडारे व पत्रकार संतोष कासे यांचा वाढदिवसानिमित्त आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवारातर्फे सत्कार.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे तसेच जनक क्रांती न्यूजचे पत्रकार संतोष कासे यांच्या वाढदिवसानिमित्त आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवाराच्या  वतीने त्यांचा मानाची टोपी, शाल पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषद परिसरातील बागेमध्ये सत्कार करण्यात आला.  हा सत्कार पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमावेळी पत्रकार विजयकुमार लोंढे यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थित दोन्ही पत्रकार बांधवांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. त्यांनी दोघांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, यशवंत पवार, रेल्वे पोलीस उपनिरीक्षक तांबोळी साहेब, विजयकुमार लोंढे, युवा पत्रकार अक्षय बाबुलात,मिलिंद प्रक्षाळे, नागेश पासकंटी, सलाउद्दीन शेख, ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख, नितीन करजोळे, साजिद शेख, नितीन कांबळे, युनुस अत्तार, गिरमल्ला गुरव, मुसा अत्तार, ज्येष्ठ पत्रकार अरूण सिडगिद्दी, नरेन कांबळे, अशोक ढोणे, विजयकुमार उघडे, सुधीर डोळ्ळे, मुस्...

शक्ती अॅटो अँड ट्रॅक्टर कंपनीतर्फे ‘गौरव नारी शक्तीचा’ उपक्रम उत्साहात.

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट   जागतिक महिला दिनानिमित्त “गौरव नारी शक्तीचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शक्ती अॅटो अँड ट्रॅक्टर कंपनी, अक्कलकोट यांच्या वतीने करण्यात आले. शेती, समाज आणि कुटुंब व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला शेतकरी भगिनींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता हसापूर रोड बायपास ब्रिज येथील शक्ती अॅटो ट्रॅक्टर कंपनी परिसरात पार पडला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शांभवी सचिनदादा कल्याणशेट्टी, जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, आकांक्षा अग्रवाल, आसावरी सराफ, शुभम अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष संतोष सपकाळ, सेक्रेटरी युगंधर शिंदे, रोटरी क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष गुरुशांतप्पा पाटील व सेक्रेटरी प्रदीप तोरस्कर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रेमा शिवशंकर पाटील व शिवशंकर पाटील यांनी मानाचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ दे...

इंगळगी झेडपी शाळेसाठी उद्योजिका अश्विनी हत्तुरे यांच्याकडून एक लाख रुपयांची देणगी.

Image
दक्षिण सोलापूर: इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजिका अश्विनी शिवानंद हत्तुरे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश शाळेला सुपूर्द केला. प्रतिनिधी -सोलापूर,  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजिका अश्विनी शिवानंद हत्तुरे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश शाळेला सुपूर्द केला. उद्योजिका अश्विनी शिवानंद हत्तुरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा धनादेश शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीप्ती निकम, उपाध्यक्ष मनोजा सोनकडे तसेच शाळेचे शिक्षक शेखलाल शेख आणि डॉ. अनिल सर्जे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या निधीच्या माध्यमातून शाळेतील पायाभूत सुविधा, शैक्षणिक उपक्रम आ...