कुमठ्याचे श्रीरंग दिनकर बनसोडे राज्य खो-खो निवड समितीवर
कुमठे (प्रतिनिधी) : राज्यातील खो-खो क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी घटना घडली असून, कुमठे गावचे सुपुत्र श्रीरंग दिनकर बनसोडे यांची राज्य खो-खो निवड समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत सन 2026-27 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद तसेच निवड चाचणी स्पर्धांसाठी त्यांची निवड जाहीर करण्यात आली.
श्रीरंग बनसोडे हे सध्या जि. प. शाळा अंत्रोळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून, सोलापूर खो-खो असोसिएशनचे खजिनदार आणि राष्ट्रीय पंच म्हणूनही ते काम पाहत आहेत. तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना, शाखा दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष म्हणूनही ते सक्रिय आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, उपाध्यक्ष महेश गादेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी गुरुबाळा सनके, आयुब कलबुर्गी, कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीशैल कोरे, मुख्याध्यापक युवराज राठोड यांच्यासह शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि सोलापूर खो-खो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240