प्रथमेश लघाटे यांच्या शास्त्रीय गायन सेवेत श्रोते मंत्रमुग्ध
श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त सुरु असलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील दहावे पुष्प आज मुंबई येथील शास्त्रीय गायक प्रथमेश लघाटे यांच्या शास्त्रीय गायन सेवेने संपन्न झाले.
![]() |
| वटवृक्ष स्वामी मंदिरात गायन सेवा सादर करताना प्रथमेश लघाटे व सहकारी. |
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा.ओंकार पाठक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी गायक प्रथमेश लघाटे व सर्व मान्यवर कलाकारांचा श्री स्वामी प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी देवस्थानचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, अक्षय सरदेशमुख, संतोष देगांवकर, मनोहर
देगांवकर, स्वामीनाथ लोणारी, संजय पाठक, डॉ.मल्लीनाथ बोधले सर, ज्योती जरीपटके, लता कुलकर्णी, दिपक
जरीपटके, प्रसाद पाटील सर, रमेश शिंदे सर, प्रा.शिवशरण अचलेर, मयूर स्वामी,
बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सुनिल पवार, आकाश चव्हाण, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, संजय पवार, अमर पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, श्रीमुख जगदाळे, मनोज जाधव, सागर गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे यांच्यासह असंख्य स्वामीभक्त व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकऱ्यांनी उपस्थित राहून या गायन सेवा श्रवणाचा आनंद लुटला.
फोटो ओळ - वटवृक्ष स्वामी मंदिरात गायनसेवा सादर करताना प्रथमेश लघाटे व सहकारी दिसत आहेत.
प्रथमेश लघाटे यांच्या शास्त्रीय गायन सेवेत श्रोते मंत्रमुग्ध
अक्कलकोट, दि. १२ (प्रतिनिधी) – श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन महोत्सवात दहावे पुष्प मुंबईचे प्रख्यात शास्त्रीय गायक प्रथमेश लघाटे यांच्या प्रभावी गायन सेवेने रंगले. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित स्वामीभक्त अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
‘आयडिया सा रे ग म’ फेम प्रथमेश लघाटे यांनी सहकलाकारांसह श्री स्वामी समर्थांच्या दरबारात विविध भक्तिगीते, अभंग आणि शास्त्रीय रागांची सुरेख मैफल सादर केली. ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘निशंक हो निर्भय हो मना रे’ हा स्वामी समर्थांचा तारकमंत्र, ‘दत्त माझी माता-दत्त माझा पिता’, ‘इंद्रायणीकाठी लागली समाधी ज्ञानेशाची’ या संतवाङ्मयातील रचना त्यांनी रागदारीच्या अंगाने सादर करत श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली.
त्यानंतर ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा’ ही भावगीते भाग्यश्री रागात रंगली. ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाट्यपद भूप रागात सादर करत त्यांनी रसिकांची मनं जिंकली. गवळणी, भक्तिगीते आणि लोकगीते यांचीही मेजवानी देत वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमाची सांगता ‘स्वामी कृपा कधी करणार’ या गीताने भैरवी रागात गोड स्वरांत करण्यात आली.
या कार्यक्रमात हार्मोनियमवर हर्षल काडदरे, तबल्यावर रुपेश वझे, तर मृदंगावर मिलिंद लिंगायत यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. अनिल हर्डीकर यांनी प्रभावी निवेदन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. ओंकार पाठक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते गायक प्रथमेश लघाटे व सहकलाकारांचा श्री स्वामी प्रसाद व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी देवस्थानचे पदाधिकारी, मान्यवर आणि असंख्य स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या गायन सेवेचा मनमुराद आनंद लुटला.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240