जि. प. शाळा अंत्रोळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

अंत्रोळी (प्रतिनिधी)
 जि. प. शाळा अंत्रोळी येथे विश्वरत्न, विश्वभूषण, महामानव, परमपूज्य, बोधिसत्व आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी तसेच शिक्षक श्रीरंग बनसोडे सर आणि कीर्ती जाधव मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. आपल्या भाषणातून त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. भीमगीते, नृत्यविष्कार आणि इतर सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड, श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाने, कीर्ती जाधव, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ अंत्रोळीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे, सदस्य विक्रम जाधव, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ म्हमाने सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीनाक्षी राठोड यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.