उत्तर सोलापूरात सामाजिक समतेचा प्रभावी संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य शालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
प्रतिनिधी -सोलापूर
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती शिक्षण विभाग उत्तर सोलापूर यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहांतर्गत सौ संस्कृती राम सातपुते सभापती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संकल्पनेतून सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य शालेय वक्तृत्व स्पर्धा SVCS बीएड कॉलेज, उत्तर सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
स्पर्धा तालुक्याचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग व गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडली.
कार्यक्रमास उत्तर सोलापूर तालुक्याचे सभापती तेजस्विनी बोराडे, अमोल बोराडे,शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार,विस्ताराधिकारी सोमनाथ शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.*सदर कार्यक्रमासाठी SVCS हायस्कूल ब्रह्मठ होटगी या संस्थेचे सचिव मा. मुख्यकार्यकारी एस स्वामी साहेब ,प्राचार्य, शिक्षक वृंद व परिचर वर्ग या सर्वांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या यशासाठी बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे, डोणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बाबुराव कोळी, कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्धाराम वाघमोडे, देगाव केंद्राचे केंद्रप्रमुख लतिफ तांबोळी, शेळगी केंद्र प्रमुख चंद्रकांत वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.परीक्षक म्हणून निवृत्ती दळवी व चंदू शिंदे यांनी उत्कृष्ट मूल्यमापन केले.
विशेष शिक्षक बी. एम सोनकडे, बालाजी थिटे, लक्ष्मण काशीद यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
स्पर्धेतील विषय विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक ठरले—डॉ. आंबेडकर यांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य उदा.महिलांना दिलेले मतदानाचा हक्क, वारसा हक्क, प्रसूती रजेचा हक्क,चवदार तळे महाड शताब्दी वर्ष विशेष,मानवी हक्काचे महत्व तसेच संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव. विद्यार्थ्यांनी प्रभावी मांडणी करत सामाजिक समतेचा संदेश ठामपणे पोहोचवला.
यावेळी सभापती तेजस्विनी बोराडे यांनी आपल्या मनोगतात या वक्तृत्व स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले व विशेषतः समाज कल्याण विभागाच्या सभापती सौ.संस्कृती राम सातपुते यांचे या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आजच्या पिढीवर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला.यांनी मनोगतातून स्पर्धकांचे कौतुक करून उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महताब शेख यांनी केले, तर आभार बापूराव जमादार यांनी मानले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही स्पर्धा केवळ शालेय उपक्रम न राहता सामाजिक समतेची जाणीव जागवणारा प्रेरणादायी सोहळा ठरला.
---------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक-सिद्धार्थ भडकुंबे
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240



Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240