Posts

Showing posts from May, 2026

ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज दि.३१ मे रविवारी भव्य कार्यगौरव सोहळा.

Image
प्रतिनिधी |सोलापूर  सोलापूर, प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ नेते हमीरसिंह ऊर्फ हेमू चंदेले यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार व कार्यगौरव समारंभ रविवारी (दि. ३१ मे) सकाळी १०.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्राचे उपाध्यक्ष प्रा. विलास बेत आणि सचिव रवींद्र मोकाशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विशेष सोहळ्याला खासदार शाहू शहाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे राहणार आहेत.कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार रजनी पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अमित देशमुख, काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पवार, माजी मंत्री अशोकराव पाटील, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच पुण्यश्लोक आहिल्...

“जनतेसाठी सीईओंचे दरवाजे खुले!”; सोलापूर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आठवड्यातून दोन दिवस नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी कुशल जैन यांनी नागरिकाभिमुख प्रशासनाचा वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामीण भागातून विविध समस्या, तक्रारी आणि मागण्या घेऊन जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांना थेट आपली बाजू मांडता यावी यासाठी त्यांनी आठवड्यातून दोन दिवस भेटीची वेळ निश्चित केली आहे.सीईओ कुशल जैन यांनी दर सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत नागरिकांना भेटण्यासाठी वेळ राखून ठेवली आहे. या वेळेत जिल्ह्यातील कोणताही नागरिक जिल्हा परिषद मुख्यालयात येऊन आपल्या समस्या, तक्रारी किंवा सूचना थेट सीईओंसमोर मांडू शकतो. विशेष म्हणजे, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी त्यांनी पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धत अवलंबली आहे. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती संबंधित विभागाकडे पाठविली जाते. त्यानंतर त्या विभागाने केलेल्या कार्यवाहीचा तपशील तक्रारदाराला लेखी स्वरूपात कळविण्यात येतो. त्यामुळे तक्रारींच्या पाठपुराव्याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळत असून प्र...

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

Image
अक्कलकोट | प्रतिनिधी  अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील श्री शिव सोमनाथ शिवाचार्य संस्थान मठ यांच्या मठाधिपतींचा पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात, वेदमंत्रांच्या गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जगद्गुरु श्रीमद् रंभापुरी पीठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु प्रसन्नरेणुक डॉ. वीरसोमेश्वर राजदेशी केंद्र शिवाचार्य भागवत पाद बाळेहुन्नूर रंभापुरी यांच्या दिव्य सानिध्यात हा ऐतिहासिक धार्मिक सोहळा पार पडला. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ वाजता जगद्गुरुंसह श्री मुरुगेंद्र शिवाचार्य यांचे हिरेमठ येथे आगमन झाले. त्यानंतर श्री १०८ षटस्थल ब्रह्मी मुगेंद्र शिवाचार्य यांच्या कर्तृ समाधीसमोर महाउपदेश कार्यक्रम पार पडला. धर्मसभेत मार्गदर्शन करताना जगद्गुरूंनी करजगीतील मठाचा विकास आणि धार्मिक कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सर्व भक्तांनी तन, मन आणि धनाने सहकार्य करावे, असे आवाहन केले.दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता करजगी, बंकलगी, कुंभारी तसेच परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य धर्मसभा पार पडली.  यावेळी पूज्य श्री रेणुक देवरू यांना श्र...

महाबीजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांना मातृशोक; लातूर येथे आज सायंकाळी अंत्यसंस्कार

Image
प्रतिनिधी -सोलापूर,  महाबीजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मातोश्री श्रीमती कमलाबाई विरूपाक्षअप्पा स्वामी यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे स्वामी कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. श्रीमती कमलाबाई स्वामी या उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या देखील मातोश्री होत. त्यांच्यावर आज सायंकाळी 5 वाजता लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्वामींच्या वटवृक्षाची ऐतिहासिक गाथा ऐकून भारावलो - पोलीस आयुक्त एम. राजकुमार

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट             श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष सहवासाने पुनित झालेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील वटवृक्षाची गाथा ऐकून आपण भारावलो असल्याचे मनोगत भारतीय पोलीस सेवेतील सोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी व्यक्त केले. नुकतेच पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास प्रथमच भेट देऊन सपत्निक श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची भौगोलिक रचना व मंदीरातील वटवृक्षाचा इतिहास, व मंदीरातील दीनक्रम प्रथमेश इंगळे यांच्या कडून जाणून घेतल्यानंतर पोलीस आयुक्त एम.राजकुमार बोलत होते. प्रारंभी देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांचं स्वागत व दर्शनानंतर सपत्निक स्वामींचं कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.  पुढे बोलताना पोलीस आयुक्त एम.राजकुमार वटवृक्ष हा फक्त झाड नाही, स्वामी समर्थांचं जिवंत स्मारक आहे. १७० वर्षांपेक्षा जास्त झाले तरी हा वटवृक्ष आजह...

अक्कलकोटच्या 63 हजार शेतकऱ्यांना खरीप पीक विमा व व्याज सवलतीची मागणी;शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट,   अक्कलकोट तालुक्यातील सुमारे 63 हजार शेतकऱ्यांना 2025 चा खरीप पीक विमा तातडीने मिळावा तसेच पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून देण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शिवसेना नेते व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी आनंद तानवडे, विश्वनाथ भरमशेट्टी, सिद्धार्थ गायकवाड, अश्फाक अगसापुरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी, “शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा न मिळाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली. --------------------------------------  जनता संघर्ष न्यूज,सोलापूर   बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

कोल्हापूरच्या कन्हेरी मठास नगरसेवक महेश इंगळे यांची मित्र परिवारासह सदीच्छा भेट.

Image
काड सिद्धेश्वर महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करताना चेअरमन- नगरसेवक महेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी -अक्कलकोट           येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी आज नियोजीत कोल्हापूर दौऱ्याच्या माध्यमातून मित्र परीवारासमवेत कोल्हापूर येथील कन्हेरी मठास सदीच्छा भेट दिली. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी श्री काड सिद्धेश्वर महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी महेश इंगळे यांनी कणेरी मठाच्या मुर्त स्वरूपातील ग्रामीण जीवनशैली पाहणी केली व उपस्थित भक्तांच्या वतीने मठाची व तेथील समितीच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन स्तुती केली. यावेळी कणेरी मठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहाय्यक महेश सुधाकर लंबे, प्रा.शिवशरण अचलेर सर, अंकुश केत, ज्ञानेश्वर भोसले, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, सोमनाथ सुतार, सागर गोंडाळ, श्रीकांत झिपरे, मनोज...

बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते चौडेश्वरी देवीची आरती संपन्न.

Image
बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांचा सत्कार करताना चौडेश्वरी देवस्थानचे चेअरमन शिवशरण लकाबशेट्टी व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी -अक्कलकोट  तालुक्यातील बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते चौडेश्वरी देवीची आरती भाविक भक्तांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठया भक्तीभावात संपन्न झाली.  आरती नंतर श्री चौडेश्वरी देवस्थानचे चेअरमन शिवशरण लकाबशेट्टी यांच्या हस्ते देवीजींचे कृपावस्त्र, श्रीफळ, प्रसाद देऊन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व प्रथमेश इंगळे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यानंतर श्री चौडेश्वरी देवस्थानचे चेअरमन शिवशरण लकाबशेट्टी व पदाधिकाऱ्यांचा श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने प्रथमेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला.  यावेळी देवीची ओटी भरुन मोठ्या भक्तीभावात शासकीय बाशिंग देवीस अर्पण करण्यात आले. यावेळी देवस्थानचे पुजारी मल्लिकार्जुन सोमेश्वर, चंद्रेशखेर पुजारी, राजा उंबरजे सर, गंभ्मीर मड्डी, श्रीशैल खानापूरे सर, संजय मडडी, निलकंठ पाटील...

शाहू स्पोर्ट्स क्लब दक्षिण सोलापूर आयोजित उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन.

Image
प्रतिनिधी -अंत्रोळी, ता.द. सोलापूर  शाहू स्पोर्ट्स क्लब दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जि. प. शाळा अंत्रोळी येथे उत्साहात पार पडले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय खो-खो पंच तथा सोलापूर खो-खो असोसिएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे सर प्रमुख उपस्थित होते. तसेच शाहू स्पोर्ट्स दक्षिण सोलापूरचे खजिनदार नागनाथ म्हमाने, मार्गदर्शक सदानंद गुजले, ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत कोकरे यांची उपस्थिती लाभली. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना खो-खो खेळाचे तांत्रिक प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती तसेच खेळातील शिस्त याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. -------------------------------------- * जनता संघर्ष न्यूज,सोलापूर  * बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

Image
प्रतिनिधी -सोलापूर  वाढती महागाई, इंधनदरवाढ आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) सोलापूर शहरच्या वतीने आज शहरात “मोफत बैलगाडी प्रवास” हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष निलेश संगेपाग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून प्रवास करत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. “देशवासियांवर बैलगाडीची वेळ येण्याआधी सरकार जागं व्हा”, “जनतेच्या खिशाला कात्री, उद्योगपतींना सवलती” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.महागाई, इंधनदरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मोठ्या उद्योगपतींना सवलती दिल्या जात असताना सामान्य जनतेलाच त्याग करण्यास भाग पाडले जात असल्याची टीकाही करण्यात आली. यावेळी निलेश संगेपाग यांनी केंद्र सरकारने देशहितासाठी कठोर भूमिका घ्यावी, तसेच उद्योगपती आणि नेत्यांनाही त्यागासाठी पुढे आणावे, असे मत व्यक्त केले. माजी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनी पीएम केअर फंड आणि भाजपचा निधी देशासाठी वापरण्याची मागणी ...

PMPL Season 20 क्रिकेट स्पर्धा भंडारी ग्राउंड, जुळे सोलापूर येथे उत्साहात संपन्न.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  जुळे सोलापूर येथील भंडारी ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या PMPL Season 20 क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ तसेच अंतिम बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. उद्घाटन समारंभास सोलापूर महानगरपालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक प्रियदर्शन साठे, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे, पत्रकार कृती समिती अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, सारा न्यूजचे संपादक डॉ. राम हुंडारे, पीएमसीसीचे संस्थापक परमेश्वर माळगे, ॲड. विजय कोनापुरे, काशिनाथ औरसंग, अप्पा रामदासी, प्रकाश स्वामी, लक्ष्मण कावळे, अविनाश बोधले, विशाल पाटील, सनी कीर्तने, कौस्तुभ स्वामी, धर्मराज नाशी आणि प्रथमेश माळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धेमध्ये विविध संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. संघमालकांमध्ये श्रीकांत पाटील (Shree Warriers), प्रतीक सोनवणे (Royal Challengers), वैभव कांबळे (Bhuvi Angel 11) आणि शुभम टंकाळे (SNV Royals) यांनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण सोहळ...

स्विमिंग ग्रुप सदस्यांनी नविन इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी खरेदी करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला दिला प्रतिसाद.

Image
सुनील पवार, प्रसन्न हत्ते, विश्वनाथ देवरमनी यांच्या नुतन इलेक्ट्रीक दुचाकी व चारचाकी वाहनांचे महेश इंगळे यांच्या हस्ते पुजन. प्रतिनिधी -सोलापूर             येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक व स्विमींग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार  स्विमिंग ग्रुप सदस्यांनी नविन इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनं खरेदी कली आहेत. देशातील नागरिकांनी इंधन बचतीसाठी इलेक्ट्रीक वाहने वापरण्यासंदर्भात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिल्याबद्दल अक्कलकोट तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने व शहरातील नागरीकांच्या वतीने स्विमींग ग्रुपचे सदस्य व इलेक्ट्रीक वाहनं खरेदी धारक सुनील पवार, प्रसन्न हत्ते, विश्वनाथ देवरमनी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.          स्विमिंग ग्रुपचे सदस्य सुनील पवार यांनी टीव्हीएस इलेक्ट्रिक व्हेईकल स्कुटी, प्रसन्न हत्ते यांनी ऑर्बिटर इलेक्ट्रिक व्हेईकल स्कुटी, तर विश्वनाथ देवरमनी सर यांनी हॅरियर इलेक्ट्रिक व्हेईकल कार खरेदी केले आहेत. ज्यांचे पुजन आज स...

पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट द्या; पत्रकार सुरक्षा समितीचे धरणे आंदोलन.

Image
  सोलापूर (प्रतिनिधी)   पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकीतून पत्रकार सातत्याने कार्य करत असतात. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय घडामोडींचे वृत्तांकन करण्यासाठी तालुका व ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार प्रवास करावा लागतो. यासाठी अनेक पत्रकार दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा वापर करतात. मात्र, प्रत्येक वेळी टोल भरावा लागत असल्याने पत्रकारांवर आर्थिक भुर्दंड पडत असल्याची भावना व्यक्त करत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने रविवारी जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये वार्तांकनासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना नियमित ये-जा करावी लागते. त्याचबरोबर आमदार, खासदार, मंत्री यांच्या सभा, बैठका, दौरे व विविध कार्यक्रमांचे वृत्तांकन करण्यासाठीही पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. त्यामुळे पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट द्यावी, अ...

पत्रकारांच्या टोलमुक्तीसाठी पत्रकार सुरक्षा समितीचा एल्गार; रविवारी धरणे आंदोलन

Image
सोलापूर (प्रतिनिधी) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय घडामोडींचे वृत्तांकन करण्यासाठी सतत प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, विविध महामंडळांची कार्यालये तसेच आमदार, खासदार, मंत्री यांच्या बैठका व दौऱ्यांच्या वृत्तांकनासाठी वारंवार सोलापुरात यावे लागते.ग्रामीण भागातील अनेक पत्रकारांकडे चारचाकी वाहने असून वृत्तसंकलनासाठी ये-जा करताना त्यांना नियमित टोल भरावा लागत आहे. त्यामुळे पत्रकारांवर आर्थिक भुर्दंड पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दि. 16 जुलै 2025 रोजी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी विभागीय आयुक्त, पुणे यांची भेट घेऊन पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पत्रकार सुर...

आंबेडकरी विचारांना शिवसेनेची सलामी;खा.ज्योतीताई वाघमारे यांचा उमा अकोलकर माळी यांनी केला सत्कार.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  आंबेडकर चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व तथा राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे यांची उत्तर सोलापूर तालुक्याच्या शिवसेना तालुकाप्रमुख उमा अकोलकर-माळी यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत यशवंत फडतरे, वैशाली पवार, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदिच्छा भेटीदरम्यान सामाजिक, राजकीय व चळवळीतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ---------------------------------------- ------------------------------------- जनता संघर्ष न्यूज,सोलापूर  संपादक -सिद्धार्थ भडकुंबे  बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

मातृत्व दिनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची माणुसकी; गरोदर मातेला दिला तत्काळ दिलासा

Image
सोलापूर (प्रतिनिधी) मातृत्व दिनानिमित्त सोलापूरच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला. दमानी नगर येथील गरोदर माता मधुरिशा चव्हाण यांना सिझेरियन प्रसूतीसाठी तातडीच्या उपचारांची गरज असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून उपचारांची व्यवस्था केली. महानगरपालिकेतील तांत्रिक अडचणींमुळे रुग्णालयात शिफ्ट करण्याची गरज निर्माण झाली होती. उपमहापौर देवकर यांनी डॉक्टर व शासकीय रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधत तातडीने प्रसूती करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मधुरिशा चव्हाण यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. आनंदाची बातमी समजताच उपमहापौर देवकर यांनी रुग्णालयात जाऊन आई व बाळाची भेट घेतली. नवजात बालिकेला बेबी किट भेट देत त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. ---------------------------------------

अरुणभाऊ क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, कर्मचारी  चळवळीतील नेते अरुणभाऊ क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र जिल्हाधिकारी श्री कार्तिकेयन तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती यांनी दिले असून, या निवडीबद्दल अरुण क्षीरसागर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.     अरुण क्षीरसागर हे 2007 पासून कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. जिल्हा परिषदेमधील सेवा काळात त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा संघर्ष योद्धा हा गौरवांक प्रसिद्ध झालेला असून, कास्ट्राइब संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून पदावरती कायम ठेवले आहे. अरुण क्षीरस...

तलवारबाजीत चमक, शिक्षणातही अव्वल ; रुचिता कनकीला दहावीत 99 टक्के गुण

Image
  सोलापूर : इंडियन मॉडेल स्कूलची विद्यार्थीनी कु. रुचिता यलप्पा कनकी हिने दहावीच्या परीक्षेत 99 टक्के गुण मिळवत शाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या रुचिताचे सर्वत्र कौतुक होत आहे. रुचिताने तलवारबाजी स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. खेळ आणि शिक्षण यांचा उत्तम समतोल साधत तिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळविले आहे.रुचिता या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सहाय्यक लेखा अर्चना कनकी यांच्या कन्या आहेत. तिच्या या यशाबद्दल इंडियन मॉडेल स्कूलचे विश्वस्त अमोल जोशी आणि सायली जोशी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. --------------------------------------------------------------

गरीब श्रीमंत भेदभाव न बाळगता स्वामी भक्तांच्या हाकेला धावून येतात - जेष्ठ अभिनेते मोहन जोशी

Image
वटवृक्ष मंदीरात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्योती जोशी यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी -अक्कलकोट  विश्वव्यापी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे या पृथ्वीताला वरील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींकडे उच्च, नीच, गरीब, श्रीमंत, शुद्र, दिन, अनाथ असा भेदभाव नाही. प्रत्येक भक्तासाठी वटवृक्ष मंदीरातील त्यांच्या मुळ चरण पादूकांचे दर्शन म्हणजे स्वामींच्या दिव्य देहबोलीचे साक्ष देणारे आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक भाविकाला ते आपल्या अस्तित्वाची प्रचिती नक्कीच देतात, म्हणून स्वामी समर्थ महाराज हे गरीब श्रीमंत भेदभाव न बाळगता स्वामी भक्तांच्या हाकेला नेहमीच धावून येतात असे मनोगत तब्बल ६०० हून अधिक हिंदी व मराठी चित्रपटात आपल्या भुमिकेला न्याय दिलेले जेष्ठ अभिनेते तथा देऊळ बंद व देऊळ बंद २ या भक्तीमय मराठी चित्रपटामधील श्री स्वामी समर्थ फेम कलाकार मोहन जोशी यांनी व्यक्त केले. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र देवून सत्कार केल्यानंतर अभिनेते मोहन जोशी यांच...

अभिनेते प्रविण तरडे यांची स्वामी भक्ती खरंच वाखाणण्याजोगी - नगरसेवक महेश इंगळे.

Image
अभिनेते प्रवीण तरडे व त्यांचे सुविद्य पत्नी तथा अभिनेत्री स्नेहल तरडे यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी -अक्कलकोट   प्रविण तरडे स्वत अनेक मुलाखतीत सांगतात की सिनेसृष्टीत  माझं करिअर स्वामींमुळेच घडलं. देऊळ बंद सिनेमाच्या आधी त्यांची परिस्थिती खूप बिकट होती. स्वामींवर सिनेमा करायचं ठरवलं आणि त्यानंतर त्यांचं नशीबच पालटलं, म्हणून अभिनेते प्रविण तरडे यांची स्वामी भक्ती खरंच वाखाणण्याजोगी असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. आज वटवृक्ष मंदीरातील देऊळ बंद २ या मराठी चित्रपटाच्या टिझर अनावरण सोहळयाचे औचित्य साधून अभिनेते प्रविण तरडे व त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहल तरडे यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रविण तरडे व त्यांचे सुविद्य पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी प्रविण तरडे यांच्या गौरवा प्रित्यर्...