नोकरशाहीचे लोकशाहीकरण झाले पाहिजे-प्रा. डॉ विजय माकणीकर

प्रतिनिधी -सोलापूर 
  लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे त्यांचे स्वातंत्र्य ही भिन्न आहे. प्रत्येकाचे प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये दिसले पाहिजे.असे मत प्रा. डॉ. विजय माकणीकर यांनी व्यक्त केले. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीने आयोजित केलेल्या बौद्धिक व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी प्रा. एम. आर. कांबळे,प्रशांत गायकवाड,दत्ता थोरे,प्रा. डॉ. सुहास उघडे, यशोदीप आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
    पुढे ते म्हणाले की, नोकरशाहीचे लोकशाहीकरण होणे अतिशय महत्त्वाचे आहे. सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे. यासाठी संविधानिक नैतिकता पाळली पाहिजे. लोकसंख्येनुसार प्रत्येकाला प्रतिनिधित्व द्यावे लागेल तरच वंचित समूहामध्ये बंधुभाव निर्माण होईल.
  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निजामुद्दीन शेख यांनी भूषविले अध्यक्ष आढाव्यात त्यांनी संविधानाची आवश्यकता संविधानाचे काटेकोर पालन करणे किती महत्त्वाचे आहे. याबद्दल आपले मत मांडले.
यावेळी इम्तियाज शेख, प्रशांत बाबर,मनीष गडदे,युवराज माने,संजय रणदिवे आदी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष सुरवसे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. किशोर जोगदंड यांनी केले पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ.भागवत गजधने यांनी करून दिली. आणि आभार प्रवीण सुकाळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तनिष्क वाघमारे, आर्यन कापुरे, मधुर गायकवाड यांनी परिश्रम घेतले

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.