महेश इंगळे हे आध्यात्मातील लोकनेते -डॉ.श्रीकांत शिंदे

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा देवस्थान कार्यालयात सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे भक्त राज्यभरासह देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. अनेक स्वामी भक्त हे नियमीतपणे स्वामींच्या दर्शनाकरिता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येत असतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने महेश इंगळे हे अत्यंत समर्पित वृत्तीने आपले जीवन देवस्थान करिता समर्पित करून स्वामी भक्तांच्या सेवेत अहोरात्र झटत आहेत, हे पाहून मनाला अत्यंत समाधान वाटले. भाविकांना वेळोवेळी सर्वोत्तम सोई सुविधा व उत्तम दर्शन नियोजन करून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त स्वामी भक्त कसे स्वामींचे दर्शन घेतील याकडे महेश इंगळे यांचा नेहमीच कटाक्षाने लक्ष असतो. त्यामुळे ते स्वतः स्वामींच्या सेवेत आपले जीवन समर्पित करून भाविकांना नेहमीच सुलभ स्वामी दर्शन व्हावे याकरिता वेळोवेळी विविध नियोजन करीत असतात. त्यांचे कार्य पाहता भाविकांना स्वामी दर्शनाची उत्तम व्यवस्था करणारे महेश इंगळे हे आध्यात्मातील लोकनेते असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार ड...