सिईओ जैन यांनी घेतला माळशिरस पंचायत समितीचा आढावा

प्रतिनिधी -सोलापूर 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज माळशिरस पंचायत समितीच्या विविध ध्वजांकित योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पंचायत समिती परिसरात जिल्हा नियोजन समितीमार्फत उभारण्यात येत असलेल्या सोलार प्रकल्पाची पाहणी केली.
तसेच माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची तपासणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाकीची पाहणी करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर तिरवंडी येथील प्राथमिक शाळेचीही पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व माळशिरसचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.