विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

 
प्रतिनिधी -सोलापूर 
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मंगळवार, 14 एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आवारातील संविधान कोनशिलेला सकाळी 10 वाजता पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात भीम शाहिर संदीप शिंदे प्रबोधन मंच, सोलापूर यांच्या वतीने भीमगीत गायन व ‘समता रजनी’ कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात संविधान उद्देशिका वाचनासह डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर निलेश विमल धायरकर (पुणे) यांचे ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे.यावेळी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार, कृषि व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.