ओंकार भजनी मंडळांचा हरिनामात रंगलेला जल्लोष; मुनीनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवात भक्तिरसाची उधळण.
श्री दिगंबर मुनीनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ओंकार भजनी मंडळांनी भावगीतांचा व हरिनामाचा जल्लोष सादर करत वातावरण भक्तिमय केले. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रात्री १० ते १२ वाजेपर्यंत रंगलेल्या हरिजागर कार्यक्रमात विविध भाषांतील सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या हरिजागरात तेलगू, मराठी, हिंदी आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये गवळण, आध्यात्मिक भावगीते, प्रबोधनपर गीते तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे संदेश देणारी गीते सादर करण्यात आली. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने आणि जयघोषाने दुमदुमून गेला.
तत्पूर्वी पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत हरीजागर, काकड आरती, हरिपाठ, हरिकिर्तन, हरिपारायण व ज्ञानेश्वरी पारायण असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी ६ वाजता महाराजांची महारथी व महापूजा आयोजित करण्यात आली. रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत श्री अशोक चिट्याल महाराज यांनी ‘श्रीमद भागवत’ या विषयावर तेलगू भाषेत प्रवचन देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आनंद गुजर, विठ्ठल वल्लमदेशी, मारुती जिंदम, नर्सिंग बिलकुल, मोहन कुरा पाटी, विष्णु कारमपुरी (महाराज), श्रीनिवास कुसुरकर, श्रीनिवास चिलवेरी, नागनाथ कारमपुरी, नागार्जुन कुसुरकर, श्रीकांत कुसुरकर, मुनीनाथ कारमपुरी, विक्रम कारमपुरी, विशाल चिलवेरी, प्रशांत जक्का, बालाजी कोटा, नर्सिंग कारमपुरी, पवित्रा कारमपुरी, प्रियंका कुसुरकर, सुनंदा कुसुरकर, अनुसुर्या कारमपुरी, सुनीता कारमपुरी, कलावती कुसुरकर, जयश्री कुसुरकर यांच्यासह अनेक भाविकांची उपस्थिती होती.
महोत्सवात ओंकार भजनी मंडळांच्या सादरीकरणामुळे भक्तिमय वातावरण अधिकच रंगतदार झाले असून, उपस्थित भक्तांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240