सिद्धार्थ तालीम संघातर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
प्रतिनिधी -सोलापूर
सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते तसेच डॉ. सूर्यप्रकाश कोठे आणि मंडळाचे प्रमुख विनोद वाघमारे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर त्रिशरण पंचशील बुद्ध पूजेनंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
मिरवणुकीदरम्यान तथागत गौतम बुद्ध यांचा देखावा सादर करण्यात आला होता. या देखाव्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.या मिरवणुकीत मंडळातील कार्यकर्ते, सभासद तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव अध्यक्ष कृष्णा कांबळे, उपाध्यक्ष गणेश लोंढे व सनी खळसुडे, कार्याध्यक्ष नरेश सोनवणे, सचिव स्वप्निल सुरवशे, खजिनदार विशाल गायकवाड तसेच मिरवणूक प्रमुख उदय वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी विश्वजित कसबे, उत्तरेश्वर वाघमारे, नितीन वाघमारे, किशोर लोंढे, समाधान गाडे, ओम भडंगे, जॉन शिखरे, गौतम दंडाडे, गौतम वाघमारे, आकाश कांबळे, विकास गायकवाड, अक्षय नडगम, योगेश सोनवणे, अक्षय वाघमारे, सौरभ सुरवसे, शीतल खळसुडे, आकेश माने, प्रदीप जगताप, चेतन कांबळे, गुलाब शेख, प्रसाद रणदिवे आणि राहुल गेजगे आदींचा सहभाग होता.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240