भीम आज्ञा संस्थेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

सोलापूर (प्रतिनिधी) : हाबू वस्ती, जुना देगाव नाका येथे भीम आज्ञा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने भारत शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे आधारस्तंभ भारत शिरसागर यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पअर्पण व मेणबत्ती प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. तसेच सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भीम बांधवांना भारत शिरसागर यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी पार पडला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष अतुल प्रक्षाळे, तसेच योगेश उघडे, आदर्श उघडे यांच्यासह बहुसंख्य भीम सैनिक व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.