Posts

Showing posts from February, 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘मराठा महोत्सव २०२६’मध्ये ‘शिवशंभू शौर्यगाथा’ महानाट्याचा भव्य सोहळा; मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले व किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती.

Image
  कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना श्रीमंत मालोजीराजे भोसले,आ. किसन कथोरे,पोलिस निरीक्षक व अन्य मान्यवर दिसत आहेत. अक्कलकोट | दि. २५फेब्रुवारी २०२६ छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित “मराठा महोत्सव २०२६” अंतर्गत भव्य ऐतिहासिक महानाट्य सोहळा गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले, अक्कलकोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्यास विशेष राजेशाही दिमाख लाभला. सकल मराठा समाज हितवर्धक मंडळ, बदलापूर यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात “शिवशंभू शौर्यगाथा” या ऐतिहासिक महानाट्याचे भव्य सादरीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील पराक्रम, स्वराज्य स्थापनेची गाथा, युद्धप्रसंग आणि राष्ट्रनिष्ठा यांचे प्रभावी दर्शन या नाट्यप्रयोगातून घडले. कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून आमदार किसन कथोरे उपस्थित होते. संयोजक श्री. अरुण दशरथ चव्हाण (स्वागताध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नि...

स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन कर्मचारी यांचे वेतना साठी 5 कोटी रूपये निधी;कृती समितीचे आंदोलनास यश..!

Image
मुबई - आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी यांनी आदोलन केले नंतर  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांने स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे वेतनासाठी ५ कोटी रूपसे निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली.  पाणी पुरवठा व स्वच्छता शासकीय कर्मचारी राज्य कृती समितीने आझाद मैदानावर आंदोलन केले होते. शासन सेवेत कायम करणे बरोबर थकीत वेतन व इतर  विविध मागण्या करणेत आले होते. मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव, पाणी पुरवठा विभागाचे सचिव , अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव नियोजन विभाग,  अभियान संचालक  जलजीवन मिशन, अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण उपस्थित होते. या बैठकीत  मुख्य सचिव यांचे बैठकीत न्यायप्रविष्ठ असलेले व न्यायालयाने निवाडे दिलेले कंत्राटी कर्मचारी यांचे बाबत शासन सेवेत कायम करणे साठी समिती गठित करणेचा शासन निर्णय काढणेत आला आहे. यामुळे राज्य कृत...

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

Image
प्रतिनिधी -सोलापूर  महाराष्ट्राला तर्कशुद्ध विचार व स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि सारथी युथ फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर तलाव परिसरात ही मोहीम पार पडली. आपदा मित्र-सखी व सारथी युथ फाउंडेशनचे स्वयंसेवकांनी मंदिरासमोरील मोकळे पटांगण, पार्किंग परिसर तसेच बोट चालविण्याच्या सरावासाठी वापरला जाणारा भाग स्वच्छ केला. तलाव परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, या भूमिकेतून टीमने रबर बोटीच्या सहाय्याने तलावातील प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, चहाचे कागदी कप, वाळलेली पाने, नारळ, निर्माल्य व इतर विविध प्रकारचा कचरा बाहेर काढला. बोटीच्या साहाय्याने सिद्धेश्वर तलाव स्वच्छ करण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला. या कार्यासाठी सिद्धेश्वर मंदिर समितीने सहकार्य केले. मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांनी उपक्रमाचे कौतुक करत मंदिर परिसरात अशा स्वच्छता मोहिमा वारंवार राबविण्या...

वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत सोलापूर महानगरपालिका राज्यात प्रथम.

Image
सोलापूर महानगरपालिकाने “माझी वसुंधरा अभियान 4.0” अंतर्गत भूमि विभागात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवत मानाचा सन्मान प्राप्त केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानगरपालिकेला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबई येथे पार पडलेल्या “माझी वसुंधरा अभियान 4.0” सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, पर्यावरण व वातावरण बदल मंत्री सुमित्रा ताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात आला. सदर सन्मान स्वीकारण्यासाठी महापौर श्री. विनायक कोंडीयाल, उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, उद्यान अधीक्षक स्वप्निल सोलंकर, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर, गणेश बिराजदार, मल्लु सकठ तसेच वसुंधरा अभियानाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या यशामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश...

पोलीस आयुक्तालय सोलापूर तर्फे गायक मोहम्मद अयाज यांचा सन्मान.

Image
  सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार,सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,पोलीस उपायुक्त हसन गोहर ,  पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील,  गायक मोहम्मद अयाज आदी दिसत आहेत  प्रतिनिधी -सोलापूर  पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्या वतीने आयोजित स्नेहमेलन व संगीत संध्या कार्यक्रमात सोलापूरचे गायक मोहम्मद अयाज यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस आयुक्तालयाच्या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत आयोजित या संगीत संध्येत ‘सोलापूर सुरमणी’ तसेच ‘महाराष्ट्राचे महागायक’ विजेते म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद अयाज यांनी आपल्या सुरेल आवाजात एकापेक्षा एक गाणी सादर करत उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मने जिंकली. त्यांच्या दमदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्हा सत्र न्यायाधीश श्री शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम, डीसीपी विजय कबाडे, डीसीपी हसन गोहर, डीसीपी अश्विनी पाटील, एसपी विजया कुर्री, एसपी राजेंद्र माने, एसीपी मच्छि...

यशोधन पतसंस्थेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

Image
प्रतिनिधी -सोलापूर  यशोधन पतसंस्था सोलापूर येथे शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी बोलताना देवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना केले. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ पुजारी, संचालक अरबाज मुल्ला, सरव्यवस्थापिका सुचेता लोकापुरे तसेच शाखाधिकारी माड्याळ साक्षी, संजय गोटे, विक्रांत घायाळ, रजनीकांत ठेंगील आदी मान्यवर उपस्थित होते. शाखेतील सर्व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. -------------------------------- जनता संघर्ष न्यूज,सोलापूर  संपादक -सिद्धार्थ भडकुंबे  बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- ९५७९८३८२४०

सोलापूरात नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Image
प्रतिनिधी -सोलापूर, दि. १३ फेब्रुवारी २०२६  सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटाला पालक व उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी होते. प्रमुख अतिथी म्हणून ख्रिस्तोफर रेनेहान (व्यवस्थापकीय संचालक, ब्लू 3 यूके लिमिटेड), मार्क बेले (संचालक, गिव एनर्जी लिमिटेड यूके), डॉ. माधवी रायते (माजी अधिष्ठाता, अश्विनी मेडिकल ग्रामीण महाविद्यालय, सोलापूर), चंद्रिकाताई चौहान (अध्यक्षा, उद्योगवर्धिनी, सोलापूर), नूतन नगरसेविका रंजिता चाकोते, सचिवा वर्षाताई विभुते, शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, सल्लागार डॉ. बंडोपंत पाटील, प्राचार्या रुपाली हजारे, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या स्मिता कुलकर्णी व मार्गदर्शिका मीना पारखे आदी मान्यवर उपस्थित होते. स्व. नागेश अण्णा करजगी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी यांच्या ह...

सेवाकर्मी कार्यक्रम गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषद प्रथम – उत्कृष्ट कामगिरीबद्दल भव्य सत्कार सोहळा संपन्न.

Image
सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. सर्व संवर्गांची अद्ययावत व ज्येष्ठता सूची, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळ सेवा नियुक्ती, रिक्त पदांची अद्ययावत माहिती, बिंदू नामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया, आय-गोट पोर्टलवर १००% नोंदणी ,तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचे अद्ययावत करणे आदी सर्व निकषांवर सोलापूर जिल्हा परिषदेने आपली प्रशासकीय गुणवत्ता सिद्ध केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कुलदीप जंगम यांचा सर्व महिला कर्मचारी वर्गाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील यांचा सर्व कर्मचारी पुरुष बांधवांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यास मा. श्री. कुलदीप जंगम (मुख्य कार्यकारी अधिकारी), श्री. चंद्रशेखर जगताप (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), श्रीमती स्मिता पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी – प्रशासन), श्रीमती मीनाक्षी वाकडे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी), स...

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील मासिक किर्तन सेवेला ११ वर्षे पुर्ण.

Image
  श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे कीर्तन सेवा सादर करताना ह.भ.प. सुधीर बुवा बाळ. अ क्कलकोट येथील  श्री वटवृक्ष स्वामी  महाराज देवस्थान येथे कीर्तन सेवा सादर करताना ह.भ.प. सुधीर बुवा बाळ. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे कीर्तन सेवा सादर करताना ह.भ.प. सुधीर बुवा बाळ.  महाराज देवस्थान  मधील मासिक कीर्तन सेवेला यंदा ११ वर्षे पूर्ण झाली असून १३३ व्या मासिक कीर्तन सेवेचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या  प्रसंगी बोलताना डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळीचे स्वामीभक्त श्री सोमदत्त आसोलकर यांनी देवस्थान समिती व संस्थेचे अध्यक्ष मा. महेश मालक इंगळे यांनी दिलेल्या अखंड स्वामी सेवेचे पुण्य आज फळाला आले असल्याचे भावोद्गार काढले. श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात नामस्मरण, मानसपूजा व कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी सोहळा रंगला. १३३ व्या मासिक कीर्तन सेवेची सांगता डोंबिवली येथील कीर्तनकार ह.भ.प. श्री सुधीर बुवा बाळ यांच्या नारदीय कीर्तनाने झाली. पुढे बोलताना सोमदत्त आसोलकर यांनी स्वामी सेवेचा ध्यास घेऊन अविरत कार्य करणारे श्री नरेश पाटील या...

कंत्राटी कर्मचारी यांनी शासन सेवेत कायम करणे साठी समिती गठीत;मुख्य सचिव यांचे बैठकीत सकारात्मक चर्चा..!

Image
मुंबई - आझाद मैदानावर सुरू असलेले पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे आंदोलन दुसरे दिवशी सुरू होते.  महाराष्ट्र राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे विविध मागण्या बाबत आज मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव, पाणी पुरवठा विभागाचे सचिव , अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव नियोजन विभाग,  अभियान संचालक  जलजीवन मिशन, अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण उपस्थित होते.   या बैठकीत वेतन अदा करणे बाबत तोडगा काढणेत आला आहे. याबाबत उद्या लेखी आश्वासन दिलेनंतर  आझाद मैदान सोडणार अशी भुमिका राज्य कृती समितीचे वतीने घेणेत आली. नागपूर चे निखिल रौंदाळकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेमुळे प्रशासन  गतिमान झाले.  मुख्य सचिव यांचे बैठकीत न्यायप्रविष्ठ असलेले व न्यायालयाने निवाडे दिलेले कंत्राटी कर्मचारी यांचे बाबत शासन ...

विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांचे मित्र परिसरासह सिंधुदुर्गकडे प्रस्थान

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट वटवृक्ष स्वामी महाराजदे वस्थानचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक  महेश कल्याणराव इंगळे हे आपल्या मित्रपरिवारासह दि.९.१०.११ फेब्रुवारी रोजी कोकणातील हडपीड मठाचे स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर व सहकाऱ्यांच्या नियोजनातून हडपीड स्वामी मठ व सिंधुदूर्ग जिल्ह्यात आयोजीत करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याकरीता मित्र परिसरासह सिंधुदुर्गकडे प्रस्थान केले. या दौऱ्यात युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा. शिवशरण अचलेर, डॉ.हिरण्णा पाटील, संतोष पराणे, नंदकुमार घाटगे, कुमार हत्तुरे, सुरेश वाले, रवि कदम, अंकूश केत, सुनिल पवार, स्वामीनाथ मुसळे, मनोज इंगुले, बाबा सुरवसे, ओंकार वाले, शेखर अडवितोटे, प्रसन्न हत्ते, साहील पवार, नामदेव माने, विश्वनाथ देवरमनी, शिवू बिडवे, कणबसे शेठ, मेजर अमोल माने, श्रीशैल गवंडी, मनोज जगताप सर, संदीप पंडीत, रामलिंग स्वामी, ज्ञानेश्वर भोसले, विभूते नंदकुमार कटारे, तुषार मोरे, ओंकार महाडीक, शंकर मलवे, आशिश सातपूते, स्वप्निल गायकवाड, महेश पाटील, राजू स्वामी, अरुण शि...

आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी आंदोलनावर ठाम प्रधान सचिव यांचेशी सकारात्मक चर्चा..!

Image
आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी आंदोलनावर ठाम  प्रधान सचिव यांचेशी सकारात्मक चर्चा..! मंगळवारी मुख्य सचिव यांचेकडे बैठक प्रतिनिधी - सोलापूर  मुंबई - आझाद मैदानावर सुरू असलेले पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे आंदोलन दुसरे दिवशी सुरू ठेवणेत आले आहे.पाच महिने पासून वेतन व प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकी साठी आज प्रधान सचिव पराग जैन यांचे समवेत झालेल्या बैठकीतील चर्चा सकारात्मक ठरली आहे. त्यामुळे उद्या निधी वितरण आदेश सोबत इतर लेखी आश्वासन दिलेनंतर आझाद मैदान सोडणार अशी भुमिका राज्य कृती समितीचे वतीने घेणेत आली. राज्यातील साडेचारशे पेक्षा अधिक कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.याबाबत उद्या १० फेब्रुवारी रोजी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे दालनात प्रधान सचिवांची बैठक होणार आहे.   आज आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलनाचे पार्शवभुमीवर जीटी रूग्णालय परिसरातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात आज प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, जल जीवन मिशन चे सहसचिव व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे अभियान संचालक बी जी पवार, अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदाळ, अवर सचिव जायकर , कक्ष अधिकारी प्रसाद स्वा...

संवेदनशीलतेचा प्रत्यय:अतनूरकर कुटुंबीयांकडून सुमन कुलकर्णी यांचे देहदान.

Image
प्रतिनिधी | सोलापूर समाजाप्रती कर्तव्यभावना जपत मानवतेचा सर्वोच्च संदेश देणारी प्रेरणादायी कृती प्रसाद अतनूरकर यांच्या मातोश्री सुमन केशवराव कुलकर्णी (वय ९१) यांनी मरणोत्तर देहदान करून केली. त्यांच्या निधनानंतर अंतिम इच्छेचा सन्मान राखत अतनूरकर कुटुंबीयांनी देहदानाचा निर्णय घेत डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली. देहदान ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाची व प्रेरणादायी कृती असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी तिचा मोठा उपयोग होतो. सुमन कुलकर्णी यांच्या या उदात्त निर्णयामुळे समाजात जीवनमूल्यांची जाणीव अधिक दृढ होण्यासोबतच देहदानासारख्या कार्यासाठी अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.कुटुंबीयांनी तत्परतेने पुढाकार घेत संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपत देहदानाची प्रक्रिया पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून देहदानाबाबत समाजात सकारात्मक संदेश पोहोचत आहे.सुमन केशवराव कुलकर्णी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या या उदात्त कार्यातून मानवतेचा दीप समाजात सदैव प्रज्वलित राहो, हीच ...