Posts

व्हीबीजी रामजी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा : जि.प. अध्यक्ष दिपक वैद्य

Image
  प्रतिनिधी - सोलापूर  भारत सरकारच्या 'विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)' (VBRAG) अधिनियम-२०२५ ची राज्यात १ जुलैपासून अंमलबजावणी सुरू झाली असून, सोलापूर जिल्ह्यात या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी "व्हीबीजी रामजी" योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण विकासाला गती द्यावी, असे आवाहन अध्यक्ष वैद्य यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अंजली मरोड, गटविकास अधिकारी अरुण वाघमोडे, नायब तहसीलदार चंदे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, प्रदीप खांडेकर, करूणा शिवशरण, चंद्रकांत जाधव, शिवाजी जाधव, सुषमा नारनवर, चैताली मुळे, उपसभापती सुनील भोसले, कृषी अधिकारी मुरलीधर राजे, लेखाधिकारी बाबासाहेब माने यांच्यासह पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नरेगा विभागाचे अधिकारी व विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना अध्यक्ष दिपक वैद्य म...

युवा नेते प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते उडगी प्रशालेत १२०० वह्या व ४० स्कूल बॅगचे वाटप;माणुसकी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट (उडगी) माणुसकी फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील उडगी हायस्कूलमध्ये मराठी, कन्नड व सेमी इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत युवा नेते तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते १२०० वह्या व ४० स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना प्रथमेश इंगळे म्हणाले, “माणुसकी फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मन लावून शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे,” असा संदेश त्यांनी दिला. या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही कौतुक होत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नागेंद्र नारायणकर सर यांनी केले. यावेळी माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत क्षीरसागर, आशिष हुंबे, बाबूशा भालके, आकाश शिंदे, रीलस्टार रवी कुंभार, रमेश शिंदे सर, अमोल महाडिक, समर्थ स्वामी, प्रसाद माने, फाउंडेशनचे सदस्य, उडगी हायस्क...

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव आधुनिक शेतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

Image
प्रतिनिधी -सोलापूर, दि. १ जुलै : कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कृषी तज्ज्ञ, कृषी निविष्ठा विक्रेते आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कृषी व पशुसंवर्धन, दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडाशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अँड. अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य नेताजीभाऊ खंडागळे, शिवमूर्ती सिद्धाराम, लखन साहेब, कुमार काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी देवेंद्र ढगे तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर अवधूत मुळे, तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापू...

मार्डी येथे शिवसेनेच्या वतीने 50 टक्के सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटप; सौ. उमा नागेश अकोलकर यांचीशिवसेना पक्ष माळी समाज क्रांतीसेना सोलापूर महिला ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.

Image
प्रतिनिधी-सोलापूर शिवसेना पक्षाच्या वतीने मारडी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथे 50 टक्के सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार मा. ज्योतीताई वाघमारे यांच्या आशीर्वादाने तसेच सोलापूरचे मा. श्री. रमेश बारस्कर साहेब, शिवसेना पक्ष, माळी समाज क्रांती सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. राजकुमार हिवरकर पाटील साहेब आणि शिवसेना ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी सौ. उमा नागेश अकोलकर माळी यांची  शिवसेना पक्ष माळी समाज क्रांतीसेना सोलापूर महिला ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती  करण्यात आली. या नियुक्तीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मा. श्री. बळीराम काका साठे, बाबांना अण्णा पाटील, प्रल्हाद भैय्या काशीद, शशिकांत मार्तंडे, सुवर्णा झाडे, श्रीकांत मार्तंडे, महेश मुडके, बबन माळी, लक्ष्मण राठोड, नंदकुमार गवळी, नागेश अकोलकर, अनंता अकोलकर, योगेश माळी (तालुकाप्रमुख, ओबीस...

कै. सुधामती शिरसट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना दप्तर व लेखनसाहित्य वाटप.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा क्रमांक ९ येथे झोन क्र. ७ चे आरोग्य निरीक्षक श्री. शेषराव शिरसट यांच्या मातोश्री कै. सुधामती लिंबाजी शिरसट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना दप्तर व लेखनसाहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमास नगरसेवक श्री. आसिफ शेख व सौ. वहिदाबी शेख, श्री. व सौ. शिरसट, श्री. भालचंद्र साखरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे महत्त्व पटवून देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. धानेश्वरी चौगुले यांनी केले, तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. पंचशीला कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. शहाबाज काझी यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. हेमलता देवानपल्ली, सौ. अनुसया सुरवसे आणि श्री. संतोष काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. ---------------------------------------- 🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर  🔹संपादक- सिद्धार्थ भडकुंबे 🔹 बातम्या व जाह...

कृषीदिनानिमित्त जिल्हा परिषदेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन; १ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  कृषी विभाग, महाराष्ट्र शासन (आत्मा, सोलापूर) व कृषी विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे संपन्न होणार आहे.जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार असून, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार-सावंत , मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, कृषी क्षेत्रातील अधिकारी व शेतकरी बांधव मोठ...

विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने अक्कलकोट पर्यटनावर संशोधन; प्रा. मयूर स्वामी यांचा निबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रकाशित

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट,  सी. बी. खेडगीज महाविद्यालय, अक्कलकोट येथील प्रा.मयूर स्वामी यांचा “श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट : आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून सामाजिक-आर्थिक परिणाम आणि विकसित भारत २०४७ साठीच्या संधी” या विषयावरील संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील ई-परिषदेत प्रकाशित झाला आहे.सर्वोदय शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, उमदी (जि. सांगली) आणि ग्लोबल फाउंडेशन, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “टुरिझम डेव्हलपमेंट इन इंडिया : प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स इन व्ह्यू ऑफ विकसित भारत २०४७” या एकदिवसीय बहुविषयक आंतरराष्ट्रीय ई-परिषदेत हा संशोधन निबंध सादर करण्यात आला.या संशोधनात श्री स्वामी समर्थ मंदिरामुळे अक्कलकोट परिसरात विकसित झालेल्या आध्यात्मिक पर्यटनाच्या सामाजिक व आर्थिक परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. तसेच विकसित भारत २०४७ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध संधी, रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि शाश्वत पर्यटनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या संशोधन निबंधामुळे अक्कलकोटचे राष्ट्री...

सोलापूर पॅटर्नचा राज्यभर विस्तार; जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ कोटींचे विमा सुरक्षा कवच – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे.

Image
प्रतिनिधी -सोलापूर,  सोलापूर जिल्हा परिषदेने १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राबविलेल्या ‘सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच’ योजनेची दखल घेत राज्य सरकारने हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही घोषणा करत सोलापूर जिल्हा परिषदेच्या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रप्रमुख पदस्थापना आदेश वितरण, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच करार तसेच जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना नवीन वाहनांच्या चाव्या प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल...

जिल्हा परिषदेत विकास, पदोन्नती आणि कर्मचारी कल्याणाचा त्रिवेणी संगम; १३ वाहनांचे वितरण, ९८ शिक्षकांना पदोन्नती, १०,५२० कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी पॅकेज करार.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सोलापूर येथे विकास, कर्मचारी कल्याण आणि प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना १३ नवीन वाहनांचे वितरण, ९८ शिक्षकांना केंद्रप्रमुख पदोन्नतीचे आदेश तसेच १० हजार ५२० अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत अभिनव सॅलरी पॅकेज योजनेचा सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या १३ नवीन वाहनांचे लोकार्पण व वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांच्यासह विविध पंचायत समित्यांच्या सभापतींना वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी प...

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; पत्रकार कृती समिती व अपाश्री मित्र परिवारातर्फे जयंती उत्साहात साजरी.

Image
प्रतिनिधी - सोलापूर, दि. 26 जून 2026  सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याणाचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 252 व्या जयंतीनिमित्त पत्रकार कृती समिती व अपाश्री मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद परिसरातील संविधान उद्देशिकेसमोर शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार, आरक्षणाची संकल्पना आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण केले. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या विचारधारेचा पुरस्कार करत शाहू महाराजांनी समाजात समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये रुजविण्याचे महान कार्य केले. त्यांच्या प्रगतिशील विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी लतिफ नदाफ, नितीन करजोळे, ईनुस अत्तार, मिलिंद प्रक्षाळे, यशवंत पवार, गिर...

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

Image
प्रतिनिधी -सोलापूर, लोककल्याणकारी राजे, दूरदृष्टीचे समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जगजीवन राम वस्ती, मोदी, सोलापूर येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वह्या) वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष दीपक गवळी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. यावेळी युवा उद्योजक साजनजी हावळे, बाबू म्हेत्रे, संतोष कदम, जेबी ग्रुपचे अध्यक्ष विक्की बनसोडे, एसपी प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर पांडगळे, सोनू खरात, सुजित उपलाकर, दीपक म्हेत्रे, राहुल सोनवणे, ईश्वर कांबळे, मंथन जानवेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी संस्थ...

दिनांक २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अपरिहार्य कारणास्तव स्थगित-प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा सनियंत्रक कादर शेख यांचे अधिकृत निर्देश आणि आवाहन.

Image
दिनांक २७ जून २०२६: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ ऐनवेळी पुढे ढकलण्यात (स्थगित) आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा TET जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.या अत्यंत संवेदनशील प्रकरणावर प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा सहनियंत्रक कादर शेख यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि परीक्षार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्देश व जाहीर आवाहन जारी केले आहे. ​१. सर्व केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख आणि परीक्षा पर्यवेक्षक यांच्यासाठी कडक निर्देश: ​परीक्षा प्रक्रिया तात्काळ थांबवा: जिल्ह्यातील ज्या-ज्या केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते, त्या सर्व केंद्रांवरील परीक्षेची तयारी तात्काळ थांबवण्यात यावी. ​केंद्रांवर सूचना फलक लावा: परीक्षा स्थगित झाल्यामुळे दूरवरून येणाऱ्या परीक्षार्थींची गैरसोय होऊ शकते. यासाठी सर्व केंद्रप्रमुखांनी उद्या (२८ जून) सकाळीच आपल्या परीक्षा कें...

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात कृतज्ञ अभिवादन.

Image
प्रतिनिधी -सोलापूर,  जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर येथे सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांनी समाजातील वंचित, बहुजन आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करून सामाजिक समतेचा संदेश पुढे नेण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, योगेश तुरेराव, चंद्रशेखर गायकवाड, राजकुमार पवार, प्रवीण चव्हाण, पंकज आदी उपस्थित होते. उपस्थितांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. ------------------------------------ 🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 🔹 संपादक-सिद्धार्थ भडकुंबे  🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9679838240

“शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेची ज्योत तेवत ठेवणार” : एक लाख वह्या वाटप उपक्रमाचा प्रेरणादायी शुभारंभ

Image
प्रतिनिधी - सोलापूर, मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, यंदाही एक लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वह्यांचे वितरण करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जनसेवक महादेव कोगनुरे यांनी मनोगत व्यक्त करताना समाजसेवेप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. ते म्हणाले, “गरीब विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील शिक्षणाची आस पाहून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. हे वही वाटप केवळ साहित्याचे वितरण नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा प्रयत्न आहे. माझ्या हातून जसे शक्य होईल तसे हे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवण्याचा माझा निर्धार आहे.” पुढे बोलताना त्यांनी सागर सिमेंटच्या व्यवस्थापनाचे आभार मानले.गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सागर सिमेंट लिमिटेड आणि एम. के. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राबविण्यात येणा...

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेशजी इंगळे यांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन.

Image
शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गराडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व साईबाबांची प्रतिमा देऊन महेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. छायाचित्रात हा प्रसंग दिसत आहे. प्रतिनिधी -अक्कलकोट  श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन तथा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महेश इंगळे यांनी आपल्या मित्रपरिवारासह शिर्डी येथे जाऊन श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईंच्या मध्यान्न नैवेद्य आरतीस उपस्थित राहून आरतीचा लाभ घेतला. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गराडे यांनी महेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ व साईबाबांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. तत्पूर्वी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.दर्शनानंतर महेश इंगळे यांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व विश्वस्तांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिर्डी संस्थानच्या व्यवस्थापन पद्धती, भाविकांसाठी उपलब्ध सुविधा, दर्शनरांग व्यवस्था, निवास सुविधा तसेच विविध धार्मिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन्ही देवस्थानांच्या कामकाजाची पद्...

करजगी येथे २१ दिवसीय शिवयोग मौन अनुष्ठानास प्रारंभ.

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट  श्रीमद् जगद्गुरू रंभापुरी वीरसिंहासनाधीश्वर डॉ. वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य यांच्या कृपा आशीर्वादाने करजगी (ता. अक्कलकोट) येथे ष.ब्र. शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामी यांचे लोककल्याणार्थ आयोजित २१ दिवसीय शिवयोग मौन अनुष्ठानास प्रारंभ झाला आहे.बुधवार, दि. २४ जूनपासून सुरू झालेल्या या अनुष्ठानादरम्यान महास्वामी २१ दिवस मौन पाळून ध्यान, साधना व आध्यात्मिक चिंतन करणार आहेत. या कालावधीत करजगी व परिसरातील ग्रामस्थ तसेच सद्भक्त विविध सेवाकार्यात सहभागी होणार आहेत. या पवित्र मौन अनुष्ठानाचा मंगल समारोप बुधवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार असून, त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पंच कमिटीच्या वतीने करजगी व परिसरातील ग्रामस्थ, वडीलधारी मंडळी, माता-भगिनी आणि श्री मठाचे सर्व भक्तांनी तन-मन-धनाने सेवा करून या आध्यात्मिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ष.ब्र. मुरुगेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या आशीर्वादाने या पवित्र कार्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही ॲड. दयानंद साहेब यांनी केले आहे. ---------------...