पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराकडून भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी -सोलापूर, 
पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवार यांच्या वतीने साप्ताहिक सोलापूर क्रांतीचे संपादक मिलिंद नाना प्रंक्षाळे तसेच दैनिक जय होचे संपादक विजयकुमार उघडे यांचा भव्य सत्कार सोहळा जिल्हा परिषद येथील बागेत दुपारी १.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी मान्यवरांचा शाल, टोपी आणि पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जनहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. त्यांच्या पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यश लाभावे, अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
हा कार्यक्रम तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, इम्तियाज अक्कलकोटे, अशोक ढोणे, नितीन करजोळे, लतीफ नदाफ, सिद्धाराम नंदर्गी, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, बजरंग जाधव, वैजनाथ बिराजदार, अस्लम नदाफ, अकबर शेख, प्रविण पारवे, मनोज राठोड, जहिर नदाफ, महेश जाधव, दयानंद बनसोडे, यशवंत फडतरे, आंबा तळभंडारे, सुरज रजपुत, प्रशांत गायकवाड, सिद्धू पुजारी, अरीब बिलाल, सुधीर डोळ्ळे, ऋषिकेश ढेरे, शाहिद शेख, भिमा वारे, संगीता (ताई) बिराजदार, नितीन बनसोडे, बसू स्वामी, प्रकाश जावळे, प्रशांत दिलपाक, तांबोळी, अजय हिरेमठ, प्रशांत बनसोडे यांच्यासह अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य, पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मिलिंद नाना प्रंक्षाळे आणि विजयकुमार उघडे यांच्या समाजाभिमुख व जनहिताच्या कार्याचा विशेष गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
----------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
🔹बातम्या व जाहितातीसाठी संपर्क -9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.