मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा क्र. 9 येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी-सोलापूर,
मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा क्र. 9, सोलापूर येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक श्री. आसिफ शेख तसेच झोन क्र. 1 चे आरोग्य निरीक्षक श्री. शेषराव शिरसट उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य, गणवेश आणि खाऊचे वाटप करण्यात आले. उपस्थित माता-पालकांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पंचशीला कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती धानेश्वरी चौगुले यांनी केले, तर श्री. शहाबाज काझी यांनी आभार प्रदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालवाडी शिक्षिका श्रीमती देवनपल्ली, सौ. सुरवसे तसेच श्री. संतोष काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
------------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक- सिद्धार्थ भडकुंबे
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240