काँग्रेस व न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारी अर्जांवर प्रश्नचिन्ह; सूचकांच्या सह्यांवरून हरकती.
प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर आणि न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अशोक वाघमोडे यांच्या उमेदवारी अर्जांबाबत गंभीर हरकती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज सध्या धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना नामनिर्देशन पत्रावर किमान दहा मतदारांच्या सूचक म्हणून सह्या आवश्यक असतात. न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अशोक वाघमोडे यांच्या नामनिर्देशन पत्रावर भारतीय जनता पक्षाच्या सहा मतदारांच्या सह्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, संबंधित सहाही सह्या बनावट असल्याची हरकत भाजपकडून नोंदविण्यात आली आहे. यासंदर्भातील संबंधित सदस्यांची प्रतिज्ञापत्रेही हरकतीसोबत सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या नामनिर्देशन पत्रातील सूचक म्हणून नाव असलेल्या पंढरपूर येथील नगरसेवक नागेश भोसले यांनी स्वतःच हरकत नोंदवली आहे. आपल्या नावासमोरील सही बनावट असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी आक्षेप दाखल केला आहे.
या घडामोडींमुळे काँग्रेस आणि न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारी अर्जांबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून छाननीनंतर अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240