पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत प्रवेशोत्सव उत्साहात; खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन.

प्रतिनिधी -सोलापूर, 
मानवता विकास मंडळ संचलित पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशाला येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण, आरती आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल दादा नागनाथजी रणधीरे हे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूरच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, बुद्धवाशी व दलितमित्र नागनाथजी रणधीरे तसेच देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. ज्योतीताई वाघमारे म्हणाल्या, “गरिबीमुळे मजबूर होऊ नका, तर मजबूत व्हा. शिक्षण हेच यशाचे खरे साधन आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा कानमंत्र आयुष्याचा मूलमंत्र बनवा.” त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
मार्च 2026 मध्ये पंचशील माध्यमिक प्रशालेतून इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि गोड खाऊ वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे, अजहर हुंडेकरी, जहागीरदार साहेब, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या अध्यक्षा सायरा शेख, कसाब मुनाफ, समाजकल्याण अधिकारी आश्विनी मोरे, संस्थेचे संचालक महेश रणधीरे, सिद्धार्थ रणधीरे, सामाजिक कार्यकर्ते योगेश रणधीरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका महामाया ठोंबरे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महालिंग एलगोंडे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब चटे यांनी केले, तर मिलिंद ठोंबरे यांनी आभार प्रदर्शन केले.
-------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक- सिद्धार्थ भडकुंबे
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240 

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.