भाजपा कडून नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल महेश इंगळे यांचा बीजेपी नवी मुंबईचे उपाध्यक्ष गणेश कमळे यांच्या वतीने सत्कार.

 नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करताना नवी मुंबईचे उपाध्यक्ष गणेश कमळे व कुटूंबीय दिसत आहेत.
प्रतिनिधी -अक्कलकोट 
सलग ६ व्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे मालक हे यंदा बीजेपी पार्टी कडून नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल महेश इंगळे यांचा
बीजेपी नवी मुंबईचे उपाध्यक्ष गणेश कमळे परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये संपन्न झाला. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने ही गणेश कमळे व कुटुंबीयांचाही श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन नगरसेवक महेश इंगळे यांनी सन्मान केला. यावेळी नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा राजश्री कमळे,समाजसेविका आरती सगर, पूजा शेट्टी,  विहान शेट्टी, मेघा भूतांनाल यांचा सत्कार झाला. स्वामींच्या दर्शनानंतर श्री महेश इंगळे मालक यांचा श्रीफळ, शाल आणि स्वामींच्या गळ्यातील हार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचे कौतुक केले आणि नगरसेवकपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
--------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.