सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडून तहसीलदारांना निवेदन.


प्रतिनिधी -दक्षिण सोलापूर 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करत तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
तालुकाध्यक्ष दत्तात्रय घोडके व कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी नायब तहसीलदार विनायक कुलकर्णी यांच्याकडे निवेदन दिले. या वेळी तालुका उपाध्यक्ष प्रकाश पटणे, परमेश्वर कोरे, चिदानंद चिवडशेट्टी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनातील प्रमुख मुद्दे-
2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंत मर्यादित लाभ देण्याची अट रद्द करावी.

सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी.
एकवेळ समझोता (OTS) योजनेतील अट शिथिल करावी.

2 लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना आधी उर्वरित रक्कम भरण्याची अट न ठेवता कर्जमाफीचा लाभ द्यावा.

2019 च्या कर्जमाफीतील 5 हजार रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करावी.

सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी लागू करावी.
प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग चार वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अट रद्द करावी.शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण लक्षात घेऊन नियम सुलभ करावेत.

2017 च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या 6.56 लाख शेतकऱ्यांना लाभ द्यावा.

कागदपत्रांच्या त्रुटींमुळे वंचित राहिलेल्यांना तातडीने समाविष्ट करावे.
2017 च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या 6.56 लाख शेतकऱ्यांना लाभ द्यावा.

कागदपत्रांच्या त्रुटींमुळे वंचित राहिलेल्यांना तातडीने समाविष्ट करावे.
पीकविमा योजनेतील जाचक अटी रद्द करून एक रुपयांत पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी.

शेतकरीहिताच्या दृष्टीने विमा योजना सुलभ करावी.

पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून आवश्यक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.

पेरणीसाठी तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गेल्या तीन वर्षांतील सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्याची राज्यभरातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे पक्षाने म्हटले आहे.


Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.