नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये उत्साहात साजरा ‘विद्यारंभ दिन’; चिमुकल्यांच्या प्रवेशोत्सवाने शाळा गजबजली.

प्रतिनिधी -सोलापूर 
सोलापूरातील शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये ९ जून रोजी ‘विद्यारंभ दिन’ मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाने संपूर्ण शाळा परिसर आनंद, उत्साह आणि किलबिलाटाने भारावून गेला.कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. कुमार (दादा) करजगी, सचिवा सौ. वर्षा विभूते, विश्वस्त श्री. यशराज करजगी, व्यवस्थापक श्री. अक्षय चिडगुंपी, शाळेच्या मार्गदर्शिका सौ. मीना पारखे तसेच प्राचार्या सौ. रुपाली हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले तसेच कै. नागेश करजगी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा वाजताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांमध्ये नवा डबा, नवे दप्तर, वह्या आणि पुस्तकांची उत्सुकता दिसून येत होती. मित्रमंडळींना भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. दुसरीकडे, पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी पहिल्यांदाच पालकांसमवेत शाळेत पहिले पाऊल टाकले. नव्या वातावरणाची ओळख करून घेताना काही चिमुकले आई-वडिलांना सोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे शाळेच्या परिसरात भावनिक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.विद्यार्थ्यांचा पहिला दिवस संस्मरणीय ठरावा यासाठी शाळेने विशेष तयारी केली होती. वर्गखोल्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांच्या हास्य, उत्साह आणि किलबिलाटाने फुलून गेला होता.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. कुमार (दादा) करजगी यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करत नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्या सौ. रुपाली हजारे यांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. निकिता येलमेळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.