शाहू स्पोर्ट्स दक्षिण सोलापूरच्या उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ उत्साहात
प्रतिनिधी -अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर)
जि. प. शाळा अंत्रोळी येथे शाहू स्पोर्ट्स दक्षिण सोलापूर यांच्या वतीने दि. २१ मेपासून आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. किशोर व किशोरी गटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल प्रेम, शिस्त आणि खिलाडू वृत्ती विकसित व्हावी तसेच त्यांच्यातील क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा या उद्देशाने शाहू स्पोर्ट्स दक्षिण सोलापूरतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार विजेते, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन पंच मंडळाचे माजी सचिव तसेच सोलापूर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष व माजी सचिव श्रीकांत ढेपे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक तरुण भारतचे उपसंपादक, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख व खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष अजितकुमार संगवे उपस्थित होते.यावेळी शाहू स्पोर्ट्सचे सचिव व राष्ट्रीय खो-खो पंच श्रीरंग बनसोडे, खजिनदार नागनाथ म्हमाने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे, पालक सलीम शेख, शशिकांत कोळी यांच्यासह अंत्रोळी गावातील पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात श्रीकांत ढेपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "खेळामध्ये सातत्य राखून भरपूर सराव केल्यास यश निश्चित मिळते. अंत्रोळी गावातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून गावाचे नाव उज्ज्वल करावे."
या प्रसंगी राज्यस्तरीय खेळाडू गौरी शिंगण तसेच उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षक सदानंद गुजले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरंग बनसोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन नागनाथ म्हमाने यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शाहू स्पोर्ट्स दक्षिण सोलापूरच्या कार्याचे कौतुक केले.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240