जि. प. प्रा. शाळा अंत्रोळी येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

प्रतिनिधी-अंत्रोळी,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यानिमित्त गावातून वाजत-गाजत प्रभात फेरी काढण्यात आली. नव्याने प्रवेश घेतलेल्या बालकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच त्यांना गुलाब फुले, फुगे, चॉकलेट आणि पेन्सिली देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील इतर विद्यार्थ्यांचेदेखील यावेळी स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड, नागनाथ म्हमाने, कीर्ती जाधव, पुष्पा बनसोडे आणि मीनाक्षी राठोड यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व फुग्यांचे वाटप केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग बनसोडे सर यांनी केले, तर नागनाथ म्हमाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अंत्रोळी ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांच्या सहभागामुळे हा स्वागत सोहळा उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.
-----------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.