शाळा प्रवेशोत्सव 2026-27 : जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांची मजरेवाडी केंद्रास भेट
प्रतिनिधी-सोलापूर
शाळा प्रवेशोत्सव 2026-27 निमित्त सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी (कलेक्टर) कार्तिकेयन साहेब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मजरेवाडी केंद्र, कुमठे येथे भेट देऊन शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली.
यावेळी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब, डायटचे प्राचार्य इब्राहिम नदाफ साहेब, केंद्रप्रमुख सिद्धराम वाघमोडे, पोषण आहार विभागाचे शेख सर व जमादार साहेब, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, नगरसेविका वैशाली भोपळे तसेच इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा, प्रवेशोत्सवाच्या उपक्रमांचा तसेच शाळेतील विविध सुविधांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शुभेच्छा देत शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
केंद्रातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण 18,700 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी 43,900 पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
--------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240





Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240