पोलीस मित्र सोशल फौंडेशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात; अनेक मान्यवरांची उपस्थिती
सोलापूर (प्रतिनिधी)
पोलीस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद, समन्वय व सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस मित्र सोशल फौंडेशनचा पदग्रहण सोहळा सोलापूर येथील समाजकल्याण हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. वैशंपायन स्मृती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पत्रमहर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर फौंडेशनच्या नूतन पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्र, ओळखपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जयकर यांनी सांगितले की, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र आणून संस्थापक यशवंत पवार यांनी उभारलेले हे व्यासपीठ पोलीस व नागरिकांमधील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी माहिती देणे, नागरिकांमधील पोलीसांविषयीची भीती दूर करणे आणि सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करणे यासाठी संस्थेचे कार्य उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ तसेच पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर उपस्थित होते.फौंडेशनचे संस्थापक यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष राजू वग्गू, जिल्हा कार्याध्यक्ष अमर पवार, जिल्हा उपाध्यक्ष बंडू तोडकर, जिल्हा संघटक कलीम शेख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे, सोलापूर शहराध्यक्ष अंबादास गज्जम, समन्वयक गोविंद शेंडगे, कार्याध्यक्ष रशीद शेख, सचिव गणेश निंबाळकर, प्रसिद्धी प्रमुख सिद्धाराम हमाले व शहर संघटक अतुल भडंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.फौंडेशनचे संस्थापक यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष राजू वग्गू, जिल्हा कार्याध्यक्ष अमर पवार, जिल्हा उपाध्यक्ष बंडू तोडकर, जिल्हा संघटक कलीम शेख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे, सोलापूर शहराध्यक्ष अंबादास गज्जम, समन्वयक गोविंद शेंडगे, कार्याध्यक्ष रशीद शेख, सचिव गणेश निंबाळकर, प्रसिद्धी प्रमुख सिद्धाराम हमाले व शहर संघटक अतुल भडंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.याशिवाय सोलापूर शहर सदस्य आन्सर तांबोळी, अमोल कुलकर्णी, विष्णू सकट, संदीप धोत्रे, अरुण सिडगिद्दी, मोहोळ तालुका उपाध्यक्ष शहाजी शिंदे, कार्याध्यक्ष वजीर मुलाणी तसेच मंगळवेढा सदस्य परमेश्वर बिराजदार यांना नियुक्तीपत्र, ओळखपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप, डॉ. अन्वर होटगीकर, बसवराज हमाले, बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल कुलकर्णी यांनी मानले. पोलीस व नागरिकांमधील विश्वास, सहकार्य आणि संवाद अधिक दृढ करण्याच्या संकल्पनेसह हा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
-------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूj, सोलापूर
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240



Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240