सामाजिक समता व बंधुत्वासाठीच्या कार्याचा गौरव : भीमराव आंबेडकर यांना ‘साने गुरुजी समता पुरस्कार’ प्रदान
सामाजिक सलोखा, समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘साने गुरुजी समता पुरस्कार’ यंदा भीमराव यशवंत आंबेडकर यांना प्रदान करण्यात आला.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या माध्यमातून देशभर समता, सामाजिक सद्भावना, बंधुता आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. समाजातील विविध घटकांमध्ये सलोखा निर्माण करून सामाजिक परिवर्तन व राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सातत्याने योगदान दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.हा पुरस्कार गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी साने गुरुजी स्मारक येथे आयोजित राष्ट्र सेवा दल यांच्या ‘पुनर्गठन दिन’ मेळाव्यात प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना भीमराव आंबेडकर म्हणाले, “हा सन्मान माझा नसून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांचा, समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा आणि आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे.”
या पुरस्कारामुळे सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या चळवळीला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या उल्लेखनीय सन्मानाबद्दल भीमराव आंबेडकर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अभिनंदन संदेश-भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक, सोलापूर येथील अण्णासाहेब वाघमारे यांनी भीमराव आंबेडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना उदंड आयुष्य व पुढील कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.
---------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹 संपादक-सिद्धार्थ भडकुंबे
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9570848240



Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240