मातृत्व दिनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची माणुसकी; गरोदर मातेला दिला तत्काळ दिलासा
मातृत्व दिनानिमित्त सोलापूरच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला. दमानी नगर येथील गरोदर माता मधुरिशा चव्हाण यांना सिझेरियन प्रसूतीसाठी तातडीच्या उपचारांची गरज असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून उपचारांची व्यवस्था केली.
महानगरपालिकेतील तांत्रिक अडचणींमुळे रुग्णालयात शिफ्ट करण्याची गरज निर्माण झाली होती. उपमहापौर देवकर यांनी डॉक्टर व शासकीय रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधत तातडीने प्रसूती करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मधुरिशा चव्हाण यांनी गोंडस मुलीला जन्म दिला.
आनंदाची बातमी समजताच उपमहापौर देवकर यांनी रुग्णालयात जाऊन आई व बाळाची भेट घेतली. नवजात बालिकेला बेबी किट भेट देत त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

---------------------------------------

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240