अरुणभाऊ क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती.

प्रतिनिधी -सोलापूर 
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, कर्मचारी  चळवळीतील नेते अरुणभाऊ क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र जिल्हाधिकारी श्री कार्तिकेयन तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती यांनी दिले असून, या निवडीबद्दल अरुण क्षीरसागर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 
   अरुण क्षीरसागर हे 2007 पासून कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. जिल्हा परिषदेमधील सेवा काळात त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा संघर्ष योद्धा हा गौरवांक प्रसिद्ध झालेला असून, कास्ट्राइब संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून पदावरती कायम ठेवले आहे. अरुण क्षीरसागर यांनी प्रयत्न  करून कास्ट्राईब संघटनेसाठी  जिल्हा परिषदेच्या आवारात कार्यालय  निर्माण करून, आज ते सेवानिवृत्तीनंतरही पूर्णवेळ   मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहेत. 
  त्यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून संघटनेच्या कामाबद्दल जीवन गौरव पुरस्काराने त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सन्मानित करण्यात आले आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन, अरुण क्षीरसागर यांची  जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर निवड झाली असल्यामुळे, जिल्हा परिषद सर्व संवर्गीय अधिकारी कर्मचारी, मागासवर्गीय कर्मचारी  यांना आनंद झाला असून,आंबेडकरी चळवळीतल्या जाणत्या, ज्येष्ठ नेत्याचा हा सन्मान आहे या भावनेने अरुण क्षीरसागर यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
------------------------------------------




Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.