स्विमिंग ग्रुप सदस्यांनी नविन इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी खरेदी करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला दिला प्रतिसाद.

सुनील पवार, प्रसन्न हत्ते, विश्वनाथ देवरमनी यांच्या नुतन इलेक्ट्रीक दुचाकी व चारचाकी वाहनांचे महेश इंगळे यांच्या हस्ते पुजन.
प्रतिनिधी -सोलापूर 
           येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक व स्विमींग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार 
स्विमिंग ग्रुप सदस्यांनी नविन इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनं खरेदी कली आहेत. देशातील नागरिकांनी इंधन बचतीसाठी इलेक्ट्रीक वाहने वापरण्यासंदर्भात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिल्याबद्दल अक्कलकोट तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने व शहरातील नागरीकांच्या वतीने स्विमींग ग्रुपचे सदस्य व इलेक्ट्रीक वाहनं खरेदी धारक सुनील पवार, प्रसन्न हत्ते, विश्वनाथ देवरमनी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
         स्विमिंग ग्रुपचे सदस्य सुनील पवार यांनी टीव्हीएस इलेक्ट्रिक व्हेईकल स्कुटी, प्रसन्न हत्ते यांनी ऑर्बिटर इलेक्ट्रिक व्हेईकल स्कुटी, तर विश्वनाथ देवरमनी सर यांनी हॅरियर इलेक्ट्रिक व्हेईकल कार खरेदी केले आहेत. ज्यांचे पुजन आज स्विमींग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते मोठया उत्साहात संपन्न झाले. यावेळी बोलताना विश्वनाथ देवरमनी व सुनिल पवार यांनी जागतिक इंधन तुटवडा संकटाची संभाव्य पाश्वभुमी लक्षात घेता इंधन बचतीसाठी आमचे श्रद्धास्थान असलेले माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार व देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या आवाहनानुसार देश हितार्थ चळवळीत सहभागी होता आल्याचे समाधान आहे. सर्वांनी सुद्धा अशा वाहनांचा वापर करण्यास प्रोत्साहित होतील त्यासोबतच सामाजिक प्रबोधन करून इंधनाचा पर्यायी वापर अशा प्रकारे करून आपणास देश सेवा करता येईल असे सांगितले, तसेच सन्माननीय महेश मालक इंगळे यांचे मार्गदर्शन हे नेहमीच मोलाचे असतात, त्याची कास धरून चालल्यास जीवन नक्कीच सत्कर्मी लागतं असे भावोद्गारही व्यक्त केले. यावेळी स्विमिंग ग्रुपचे सदस्य प्रथमेश मालक इंगळे, संतोष मालक पराणे, ओमकार उटगे, सचिन किरनळी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, ज्ञानेश्वर भोसले, मनोज इंगोले, शेखर आडवीतोटे, कुमार हत्तुरे, शिवशरण अचलेर सर,विद्याधर गुरव सर, कलशेट्टी सर, श्रीकांत झिपरे, बाबा सुरवसे, मनोज जगताप सर, राजू एकबोटे, रफिक पठाण, पाटील, अमर पाटील, श्रीशैल गवंडी, सैदप्पा इंगळे, रमेश शिंदे सर तन्मय इचगे, आदित्य गवंडी, समर्थ भोसले, तुषार मोरे, अमोल महाडिक, समर्थ स्वामी, धनराज स्वामी आदीसह नागरीक उपस्थित होते.
------------------------------------------
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
संपादक-सिद्धार्थ भडकुंबे
 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240



 

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.