पत्रकारांच्या टोलमुक्तीसाठी पत्रकार सुरक्षा समितीचा एल्गार; रविवारी धरणे आंदोलन

सोलापूर (प्रतिनिधी)
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय घडामोडींचे वृत्तांकन करण्यासाठी सतत प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, विविध महामंडळांची कार्यालये तसेच आमदार, खासदार, मंत्री यांच्या बैठका व दौऱ्यांच्या वृत्तांकनासाठी वारंवार सोलापुरात यावे लागते.ग्रामीण भागातील अनेक पत्रकारांकडे चारचाकी वाहने असून वृत्तसंकलनासाठी ये-जा करताना त्यांना नियमित टोल भरावा लागत आहे. त्यामुळे पत्रकारांवर आर्थिक भुर्दंड पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दि. 16 जुलै 2025 रोजी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी विभागीय आयुक्त, पुणे यांची भेट घेऊन पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट देण्याची मागणी करण्यात आली होती.मात्र अद्याप शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पत्रकार सुरक्षा समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट मिळावी या मागणीसाठी रविवार दि. 17 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद (पूनम गेट) येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली.या आंदोलनात पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
----------------------------------------
 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240



Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.