तलवारबाजीत चमक, शिक्षणातही अव्वल ; रुचिता कनकीला दहावीत 99 टक्के गुण

 

सोलापूर : इंडियन मॉडेल स्कूलची विद्यार्थीनी कु. रुचिता यलप्पा कनकी हिने दहावीच्या परीक्षेत 99 टक्के गुण मिळवत शाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या रुचिताचे सर्वत्र कौतुक होत आहे.


रुचिताने तलवारबाजी स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. खेळ आणि शिक्षण यांचा उत्तम समतोल साधत तिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळविले आहे.रुचिता या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सहाय्यक लेखा अर्चना कनकी यांच्या कन्या आहेत. तिच्या या यशाबद्दल इंडियन मॉडेल स्कूलचे विश्वस्त अमोल जोशी आणि सायली जोशी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

--------------------------------------------------------------



Comments