स्वामींच्या वटवृक्षाची ऐतिहासिक गाथा ऐकून भारावलो - पोलीस आयुक्त एम. राजकुमार
प्रतिनिधी -अक्कलकोट
श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष सहवासाने पुनित झालेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील वटवृक्षाची गाथा ऐकून आपण भारावलो असल्याचे मनोगत भारतीय पोलीस सेवेतील सोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी व्यक्त केले.

नुकतेच पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास प्रथमच भेट देऊन सपत्निक श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची भौगोलिक रचना व मंदीरातील वटवृक्षाचा इतिहास, व मंदीरातील दीनक्रम प्रथमेश इंगळे यांच्या कडून जाणून घेतल्यानंतर पोलीस आयुक्त एम.राजकुमार बोलत होते.प्रारंभी देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांचं स्वागत व दर्शनानंतर सपत्निक स्वामींचं कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
पुढे बोलताना पोलीस आयुक्त एम.राजकुमार वटवृक्ष हा फक्त झाड नाही, स्वामी समर्थांचं जिवंत स्मारक आहे. १७० वर्षांपेक्षा जास्त झाले तरी हा वटवृक्ष आजही हिरवागार आहे. पारंब्या जमिनीत जाऊन नवीन खोड तयार झालंय. थोडक्यात हा वटवृक्ष म्हणजे स्वामींचा देह आहे. अक्कलकोटला येऊन स्वामींसह अशा या ऐतिहासिक वटवृक्षाचं दर्शन घेतल्याने जीवन धन्य झाले आहे असे सांगून मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आदर तिथ्याबद्दल समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचे आभार मानले. यावेळी पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, पोलिस निरीक्षक दिपक भिंताडे, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, विपूल जाधव, समर्थ स्वामी, तुषार मोरे, लखन सुरवसे, महेश मस्कले इत्यादी उपस्थित होते.

------------------------------------------
संपादक-सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240