PMPL Season 20 क्रिकेट स्पर्धा भंडारी ग्राउंड, जुळे सोलापूर येथे उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी -सोलापूर
जुळे सोलापूर येथील भंडारी ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या PMPL Season 20 क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ तसेच अंतिम बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
उद्घाटन समारंभास सोलापूर महानगरपालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक प्रियदर्शन साठे, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे, पत्रकार कृती समिती अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, सारा न्यूजचे संपादक डॉ. राम हुंडारे, पीएमसीसीचे संस्थापक परमेश्वर माळगे, ॲड. विजय कोनापुरे, काशिनाथ औरसंग, अप्पा रामदासी, प्रकाश स्वामी, लक्ष्मण कावळे, अविनाश बोधले, विशाल पाटील, सनी कीर्तने, कौस्तुभ स्वामी, धर्मराज नाशी आणि प्रथमेश माळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धेमध्ये विविध संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. संघमालकांमध्ये श्रीकांत पाटील (Shree Warriers), प्रतीक सोनवणे (Royal Challengers), वैभव कांबळे (Bhuvi Angel 11) आणि शुभम टंकाळे (SNV Royals) यांनी सहभाग घेतला होता.
बक्षीस वितरण सोहळ्यास भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक दिपक जमादार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रंगतदार झाला असून SNV Royals संघाने विजेतेपद पटकावले. संघमालक शुभम टंकाळे यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी करत चषकावर आपले नाव कोरले. तर Bhuvi Angel 11 हा संघ उपविजेता ठरला. संघमालक वैभव कांबळे यांनी संघाच्या उत्कृष्ट खेळाबद्दल समाधान व्यक्त केले.
संपूर्ण स्पर्धा खेळाडू, प्रेक्षक आणि आयोजकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडली असून परिसरात क्रीडाप्रेमींचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
-------------------------------------------




Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240