महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन
प्रतिनिधी -सोलापूर
वाढती महागाई, इंधनदरवाढ आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) सोलापूर शहरच्या वतीने आज शहरात “मोफत बैलगाडी प्रवास” हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष निलेश संगेपाग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.आंदोलनादरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून प्रवास करत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. “देशवासियांवर बैलगाडीची वेळ येण्याआधी सरकार जागं व्हा”, “जनतेच्या खिशाला कात्री, उद्योगपतींना सवलती” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.महागाई, इंधनदरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मोठ्या उद्योगपतींना सवलती दिल्या जात असताना सामान्य जनतेलाच त्याग करण्यास भाग पाडले जात असल्याची टीकाही करण्यात आली.यावेळी निलेश संगेपाग यांनी केंद्र सरकारने देशहितासाठी कठोर भूमिका घ्यावी, तसेच उद्योगपती आणि नेत्यांनाही त्यागासाठी पुढे आणावे, असे मत व्यक्त केले. माजी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनी पीएम केअर फंड आणि भाजपचा निधी देशासाठी वापरण्याची मागणी केली.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष एम. पाटील, प्राजक्त चांदणे, मल्लिकार्जुन पिलगेरी, सुचित्रा वाघमारे, रहीम शेख, रॉबर्ट गौडर, बसवराज सारंगमठ, मदणी चाचा, प्रसाद बाबानगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------------------------------Janata Sangharsh news Solapur
Cantact -9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240