अक्कलकोटच्या 63 हजार शेतकऱ्यांना खरीप पीक विमा व व्याज सवलतीची मागणी;शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

प्रतिनिधी -अक्कलकोट,  

अक्कलकोट तालुक्यातील सुमारे 63 हजार शेतकऱ्यांना 2025 चा खरीप पीक विमा तातडीने मिळावा तसेच पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून देण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.शिवसेना नेते व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी आनंद तानवडे, विश्वनाथ भरमशेट्टी, सिद्धार्थ गायकवाड, अश्फाक अगसापुरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी, “शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा न मिळाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली.

--------------------------------------

 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 

 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.